AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prakash Raj | ‘जर तुम्ही माझ्या भाषेचा अनादर केला तर..’, हिंदी भाषेच्या वादावर प्रकाश राज यांचं सडेतोड उत्तर

सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक शेखर यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावर आता प्रकाश राज यांनी उत्तर दिलं आहे. त्यांच्या एका जुन्या फोटोवरून या वादाची सुरुवात झाली आहे.

Prakash Raj | 'जर तुम्ही माझ्या भाषेचा अनादर केला तर..', हिंदी भाषेच्या वादावर प्रकाश राज यांचं सडेतोड उत्तर
Prakash Raj Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 03, 2025 | 3:37 PM
Share

मुंबई : अभिनेते प्रकाश राज यांचा तीन वर्षांपूर्वींचा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. 13 सप्टेंबर 2020 रोजी हिंदी दिनानिमित्त त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमधील त्यांच्या टी-शर्टवर हिंदी भाषेविषयी मजकूर लिहिण्यात आला होता. ‘मला हिंदी माहित नाही, जा’ असं त्यावर लिहिलेलं होतं. आता जवळपास तीन वर्षांनंतर त्यावरून वाद निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक शेखर यांनी प्रकाश राज यांचा हा फोटो ट्विट करत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तमिळनाडू पोलिसांनाही टॅग केलं आहे. त्यावर प्रकाश राज यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.

प्रकाश राज यांचं ट्विट-

‘मी सात भाषा बोलतो. एखादी भाषा बोलणं आणि शिकणं म्हणजे त्या भाषेच्या लोकांचा आदर करणे होय. मी ज्या ज्या लोकांसोबत काम केलंय, त्या प्रत्येकाची भाषा मी शिकलोय. मी माझी भाषा कोणावर थोपत नाही. पण जर तुम्ही माझ्या भाषेचा अनादर करत असाल आणि तुमची भाषा माझ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी त्याविरोधात उभा राहीन आणि त्याचा विरोध करेन’, असं ट्विट त्यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी #stopHindiImposition म्हणजेच हिंदी थोपवणं थांबवा असा हॅशटॅग वापरला आहे.

प्रकाश राज यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी

प्रकाश राज यांचा तीन वर्षांपूर्वींचा फोटो शेअर करत सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक यांनी तमिळनाडू पोलिसांना सवाल केला. ‘तुम्ही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली का’, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावरही प्रकाश राज यांनी उत्तर दिलं आहे. ‘माझं मूळ, माझी मातृभाषा कन्नड आहे. जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल, त्याचा आदर करत नसाल आणि तुमची भाषा माझ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तुमचा विरोध करणार. तुम्ही मला धमकी देताय का? सहज विचारतोय’, असं त्यांनी लिहिलं होतं.

2020 मध्ये हिंदी दिवसानिमित्त दुसऱ्या राज्यातील अभिनेत्यांवर हिंदी भाषा थोपवण्याचा विरोध प्रकाश राज यांनी केला होता. हिंदी भाषा थोपवण्याच्या विरोधात बोलणाऱ्या अभिनेत्यांमध्ये धनंजय, प्रकाश राज आणि वशिष्ठ एन सिम्हा यांचा सहभाग होता. सोशल मीडियावर त्यांनी आपापल्या अंदाजात हिंदी दिवसबद्दल मत व्यक्त केलं होतं. आता त्याच पोस्टवर तीन वर्षांनंतर एफआयआर दाखल करण्याची मागणी होत आहे.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....