AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित सराफला मिळालं खरं प्रेम ? ‘लापता लेडीज’च्या हिरॉईनसोबतचे फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

'लापत्ता लेडीज' फेम अभिनेत्री प्रतिभा रांता आणि बॉलिवूड अभिनेता रोहित सराफ यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सूत्रांनुसार, हे दोघे सध्या एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. दिवाळी पार्टीतील एकत्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यातील जवळीक स्पष्ट झाली होती. सध्या ते आपल्या नात्याला कोणतेही नाव देण्यास घाई करत नसले तरी, चाहत्यांमध्ये मात्र त्यांच्या 'डेटिंग'ची उत्सुकता वाढली आहे.

रोहित सराफला मिळालं खरं प्रेम ? 'लापता लेडीज'च्या हिरॉईनसोबतचे फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
लापता लेडीजची अभिनेत्री पडली प्रेमात?Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 8:39 PM
Share

अवघ्या काही वर्षांपूर्वी आलेला ‘लापता लेडीज ‘ चित्रपट अनेकांनी पाहिला असेल, साधी सरळ कथा, दोन नायिका आणि नायक, खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाची ऑस्कर सोहळ्यासाठीही भारतातून निवड झाली होती. याच चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये दिसलेली अभिनेत्री प्रतिभा रांता रातोरात स्टार बनली. ‘लापता लेडीज’नंतर ती बॉलिवूड स्टार बनली आणि लाखो लोकांच्या हृदयात तिने स्थान मिळवलं आहे. मात्र सध्या प्रतिभा कामामुळे नव्हे तर पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. सध्या अशा चर्चा सुरू आहेत की तिला तिचं खरं प्रेम सापडलं आहे. प्रतिभा आणि  प्रख्यात अभिनेता रोहित सराफ एकमेकांच्या प्रेमात आहेत, असंही बोललं जात आहे.   हे दोन्ही कलाकार सध्या एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहेत, असा दावा एका मॅगझिनने केला आहे.   जरी ते रोमँटिकरित्या इनव्हॉल्व असले तरी त्यांना इतक्यातच, त्यांच्या नात्याला नाव द्यायचं नाहीये,असंही समोर येत आहे.

रिलेशनशिपच्या चर्चांना जोर

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रतिभा आणि रोहित सध्या एकमेकांसोबत वेळ घावत आहेत, आनंद लुटत आहेत. ते दोघं चांगले मित्र आहेत, त्यांच्या आत्मियता आहे. ते बऱ्याचदा एकत्र वेळ घालवतात. त्यांच्यात एक नैसर्गिक जिव्हाळा आणि सहजता आहे, पण त्यांना त्यांच्या नात्याला नाव देण्याची घाई नाहीये’. मात्र असं असलं तरी रोहित सराफ आणि प्रतिभा रांता या दोघांनीही त्यांच्या डेटिंगच्या अफवांची पुष्टी केली नसली तरी हे वृत्त नाकारलं देखील नाहीये.

रोहित सराफच्या चाहत्यांनी अनेकदा त्याचं नाव प्राजक्ता कोळीसोबत जोडलं होतं. मात्र प्राजक्ताने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचा प्रियकर वृशांक खनालसोबत लग्न केलं. रोहित प्राजक्ताच्या लग्नाला उपस्थित राहिला नव्हता, पण त्याने तिला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीद्वारे शुभेच्छा पाठवल्या. “अभिनंदन प्राजक्ता कोळी आणि वृशांक खनाल. तुम्ही दोघं सर्वात सुंदर कपल” असं त्याने त्यांच्या लग्नाची पोस्ट पुन्हा शेअर करत लिहिलं होतं.

रोहित-प्रतिभाचे फोटो व्हायरल

असं असतानाच आता रोहित-प्रतिभाच्या रिलेशनची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी जेव्हा ते निखिल अडवाणीच्या दिवाळी पार्टीमध्ये एकत्र दिसले होते, तेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली. रोहित आणि प्रतिभा, दोघांनीही सारखेच कपडे घातले होते. रोहितने लाल आणि सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता, तर प्रतिभा लाल रंगाच्या शरारा सेटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. नंतर, पार्टीमधील त्यांचा एकत्र नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रोहित आणि प्रतिभा यांच्यात काहीतरी सुरू आहे, असं दिवाळी पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेकांना वाटत होतं. मात्र रोहित किंवा प्रतिभा य्चायंपैकी कोणीच यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा