AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एकटं राहणं…’ प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या बायकोनं केलेली पोस्ट व्हायरल

प्रतीक बब्बरने 14 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. या लग्नात त्याने कुटुंबाला न बोलवल्यामुळे वाद निर्माण झाला होताच पण आता त्याच्या पहिल्या पत्नीने सान्या सागरने इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

'एकटं राहणं...' प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या बायकोनं केलेली पोस्ट व्हायरल
| Updated on: Feb 16, 2025 | 5:02 PM
Share

अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अन् बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने शुक्रवारी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाइन डेला दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं. प्रतीकच्या मुंबईतील घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला.

प्रतिकच्या दुसऱ्या लग्नानंतर घरगुती वाद समोर

मात्र त्याच्या या लग्नानंतर बरीच चर्चा होताना दिसतेय ती त्याच्या घरगुती वादाबद्दलची. कारण प्रतीकने लग्नात बब्बर कुटुंबाला बोलावलं नाही, तसेच त्याच्या काही कुटुंबियांकडूनही सोशल मीडियावर पोस्टद्वारे यीच खंत जाहीरपणे व्यक्त करण्यात आली. त्यामुळे त्याचे घरगुती वाद जगासमोरच आले आहेत. अशातच आता त्याच्या पहिल्या बायकोनं केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

प्रतीक बब्बरचे पहिले लग्न सान्या सागरशी 

प्रतीक बब्बरचे पहिले लग्न सान्या सागरशी झाले होते. सान्या व प्रतीकने 2019 मध्ये लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. ते चार वर्षांनी म्हणजे 2023 मध्ये विभक्त झाले. लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोच 2020 मध्ये ते स्वतंत्र राहू लागले होते. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये प्रतिकने कायदेशीर पद्धतीने सान्यापासून घटस्फोट घेतला. सान्यासोबत विभक्त झाल्यानंतर प्रतिक प्रिया बॅनर्जीला डेट करत होता.

प्रतीकच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या बायकोची पोस्ट

आता प्रतीकच्या दुसऱ्या लग्नानंतर त्याची पहिली बायको सान्या सागरने केलेली पोस्ट चर्चेत आहे. सान्या सागरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट एकटेपणाबद्दलची आहे. “काही काळासाठी एकटं राहणं हे धोकादायक आहे. कारण त्याची सवय होते. त्यात किती शांतता आहे, हे तुम्हाला एकदा कळालं की मग तुम्हाला लोकांशी डील करावं वाटत नाही,” असं सान्याच्या या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे.

सान्या सागर ही घटस्फोटानंतर मुंबई सोडून गोव्यात स्थायिक झाली आहे. सान्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच ‘पार्टी टिल आय डाय’ या सीरिजमध्ये झळकली होती. सान्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

“लग्नात माझी फसवणूक झाली”

दरम्यान प्रतिक सान्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर एका मुलाखतीत त्याच्या लग्नाबद्दल मोकळे पणाने बोलला होता. तो म्हणाला होता की “आमचं लग्न फार घाई गडबडीत झालं. कुटुंबाकडूनही दबाव होता. मी 32 वर्षांचा होतो आणि मला वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत मूल हवं होतं. आम्ही असं ठरवलं होतं की आमच्या नात्यात समजुदारपणा आणण्याचा प्रयत्न करू. पण, ठरवल्याप्रमाणे काही झालं नाही. नंतर मला असं जाणवलं की, या लग्नात माझी फसवणूक झाली आहे”

प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य बब्बरची नाराजी 

प्रतिकने त्याच्या लग्नाला कुटुंबातील कोणालाही न बोलवल्यामुळे त्याचा भाऊ आर्य बब्बरने एक रोस्ट व्हिडिओ शेअर केला. तो आता व्हायरल झालाय.या तो असं म्हणाला आहे की, “माझ्या वडिलांची दोन लग्न झाली. आता माझा भाऊ दुसरं लग्न करतोय. माझा जो कुत्रा आहे, हॅप्पी, त्याच्या सुद्धा 2-2 गर्लफ्रेंड्स आहेत” असं म्हणत त्याने राग, नाराजी सगळंच व्यक्त केलं आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.