AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmaveer 2 | प्रवीण तरडेंनी केली ‘धर्मवीर 2’ची घोषणा; सीक्वेलमधून उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’

मंगेश देसाई यांनीच धर्मवीर चित्रपटीचीही निर्मिती केली होती . 'धर्मवीर' चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेच 'धर्मवीर 2'चं लेखन, दिग्दर्शन करणार आहेत.

Dharmaveer 2 | प्रवीण तरडेंनी केली 'धर्मवीर 2'ची घोषणा; सीक्वेलमधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट'
Dharmaveer 2Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 09, 2023 | 8:28 AM
Share

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. धर्मवीर आनंद दिघेंची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओकने साकारली. आता याच चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. ‘धर्मवीर’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान यशस्वी ठरला. या दिमाखदार यशानंतर जेजुरी इथल्या खंडोबाचं दर्शन घेऊन ‘धर्मवीर 2’ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली.

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशानंतर ‘धर्मवीर 2’ची चर्चा सुरू झाली होती. अखेर ही चर्चा केवळ चर्चा न राहता आता प्रत्यक्षात उतरण्यास सज्ज झाली आहे. साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मंगेश देसाई यांनीच धर्मवीर चित्रपटीचीही निर्मिती केली होती . ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेच ‘धर्मवीर 2’चं लेखन, दिग्दर्शन करणार आहेत.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब या माध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच…बघुयात धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2,’ अशी पोस्ट मंगेश देसाई यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली.

सीक्वेलच्या नव्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ‘धर्मवीर 2- साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’ अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ‘धर्मवीर 2’च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.