प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाचा प्री टीझर रिलीज, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

सुपरस्टार प्रभासने (Prabha) आपल्या आगामी राधे श्याम (Radhe Shyam) या चित्रपटाचा शॉर्ट प्री टीझर रिलीज केला आहे.

प्रभासच्या 'राधे श्याम' चित्रपटाचा प्री टीझर रिलीज, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

मुंबई : सुपरस्टार अभिनेता प्रभासने (Prabha) आपल्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटाचा शॉर्ट प्री टीझर रिलीज केला आहे. टीझरची सुरूवात प्रभासच्या बाहुबली लूकपासून झाली असून त्यानंतर ‘साहो’ चित्रपटाचा एक सीन आहे ज्यामध्ये प्रभास रस्त्यावर फिरताना दिसत आहे. हा शॉर्ट प्री टीझर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की संपूर्ण टीझर 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. हे प्री टीझर पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत आणि 14 फेब्रुवारीची वाट पाहत आहेत. (Pre teaser release of Prabhas’ Radhe Shyam movie)

त्यांनी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटमध्ये लिहिले आहे की, 14 फेब्रुवारीची तारीख लक्षात ठेवा. राधे श्यामचे दिग्दर्शन राधे कृष्ण कुमार यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत जस्टिन प्रभाकरण यांनी केले आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

प्रभासने 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. यानंतर तो ‘राघवेंद्र’, ‘योगी’, ‘डार्लिंग’, ‘निरंजन’, ‘रेबेल’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांत झळकला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्शन या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो लहानशा भूमिकेत झळकला होता. प्रभासचा वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘राधेश्याम’ चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते. त्या पोस्टरमध्ये प्रभासचा डॅशिंग आणि स्टाइलिश लूक दिसला होता.

संबंधित बातम्या :

रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

कोरोना काळातही रणवीर सिंहची कमाई वाढली, 9 नवीन ब्रँडने केला करार!

सनी लिओनीवर 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, केरळ गुन्हे शाखेने केली चौकशी!

(Pre teaser release of Prabhas’ Radhe Shyam movie)

Published On - 3:37 pm, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI