AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरोदर सना खानला पतीने बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत सर्वांसमोरून नेलं खेचत; भडकले नेटकरी

सना खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबा सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला तिने पती मुफ्ती अनस सय्यदसोबत पोहोचली होती. मात्र गरोदर सनाला अनसने खेचत नेल्याचं या व्हिडीओत पहायला मिळालं.

गरोदर सना खानला पतीने बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत सर्वांसमोरून नेलं खेचत; भडकले नेटकरी
सना खानला ओढत नेल्यामुळे पती ट्रोल Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 07, 2025 | 2:26 PM
Share

मुंबई : अभिनेत्री सना खान लवकरच आई होणार आहे. नुकतीच तिने पती मुफ्ती अनससोबत बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. मात्र या पार्टीतील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सनाचा पती तिचा हात धरून पटापट चालताना दिसत आहे. पत्नी गरोदर असतानाही अशा पद्धतीने तिला पटापट चालत नेणं योग्य नाही म्हणत नेटकऱ्यांनी अनसला जोरदार ट्रोल केलं आहे. या व्हिडीओमध्ये सनाला दम लागल्याचंही पहायला मिळत आहे. त्यामुळे तिचे चाहते अनसवर चांगलेच भडकले आहेत.

सनाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये मुफ्ती अनस सनाचा हात पकडून पटापट पुढे चालताना दिसतो. तर सना त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती थकली आहे आणि पटापट चालू शकत नाही. सनाच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवतोय. हे पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘गरोदर असतानाही तिला अशा पद्धतीने खेचून का घेऊन जातोय’, असा सवाल एकाने केला. तर ‘गर्भवती पत्नीची नीट काळजी घेऊ शकत नाही, मग उपवासाचा काय उपयोग’, असा टोमणा दुसऱ्या युजरने मारला. ‘जर सनाला सर्वांसमोर अशी वागणूक मिळत असेल तर तो घरात तिची काय किंमत ठेवत असेल’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

धर्माचं कारण देत सोडलं अभिनय

सनाने 2020 मध्ये अभिनयविश्वाला कायमचा रामराम केला आणि तिने अनसशी निकाह केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. सना खानने धर्माचं कारण देत अभिनयविश्व सोडलं होतं. ग्लॅमरच्या विश्वात यश मिळूनही मानसिक समाधान कधीच मिळालं नसल्याचं तिने म्हटलं होतं. सनाने सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. तर बिग बॉसच्या सहाव्या सिझनमध्येही तिने भाग घेतला होता.

“माझ्याकडे नाव, प्रसिद्धी, पैसा हे सगळं होतं. मी काहीही करू शकले असते आणि मला हवं तसं राहू शकले असते. परंतु एक गोष्ट जी हरवली होती, ती म्हणजे मनाची शांती. माझ्याकडे सर्व काही असूनही मी आनंदी का नाही, असा प्रश्न मला पडायचा. मी नैराश्यात गेले होते,” असं तिने कलाविश्व सोडण्याविषयी सांगितलं होतं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.