Video | पाचगणीत ‘गोलू-पोलू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान आले अनोखे पाहुणे, पाहा प्रिया बापटने काय केले…

मराठी मनोरंजन विश्वातली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट तिच्या एका थ्रोबॅक व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रिया बापट (Priya Bapat) अभिनित ‘वजनदार’ या चित्रपटातील हा व्हिडीओ असून, सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Video | पाचगणीत ‘गोलू-पोलू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान आले अनोखे पाहुणे, पाहा प्रिया बापटने काय केले...


मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट तिच्या एका थ्रोबॅक व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रिया बापट (Priya Bapat) अभिनित ‘वजनदार’ या चित्रपटातील हा व्हिडीओ असून, सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या मराठी सिनेमासृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री या चित्रपटासाठी एकत्र आल्या होत्या (Priya Bapat Throwback video from film vajandaar goes viral on internet).

‘ज्या बारीक नसतात त्या जाडच असतात’ अशी टॅगलाईन या चित्रपटाची होती. विशेष म्हणजे सई आणि प्रिया यांनी या चित्रपटासाठी तब्बल 10-12 किलो वजन वाढवले होते. मराठी चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीने असा प्रयोग केला नव्हता. या चित्रपटाला लोकांची पसंतीची पावती मिळाली होती. याच चित्रपटाच्या ‘गोलू-पोलू’ या गाण्याचा हा मेकिंग व्हिडीओ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

पाहा हा व्हिडीओ

पाचगणीतल्या एका हॉटेलमध्ये ‘वजनदार’ या चित्रपटातील ‘गोलू पोलू’ या गाण्याचे शूटिंग चालू होते. याच वेळी अचानक तिथे काही माकडं आली. ही माकडं पाहून अभिनेत्री प्रिया बापटने तिथून पळ काढला. प्रियाचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. तिच्या चाहत्यांना देखील हा व्हिडीओ खूप आवडला आहे. चाहते या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

प्रिया-उमेशला कोरोनाची लागण

अभिनेता उमेश कामत (Umesh kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) यांना कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. दोघांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन झाले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. या दरम्यान ते त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते. नुकतीच त्यांनी चाहत्यांना कोरोनामुक्त झाल्याची गुडन्यूज देखील दिली आहे (Priya Bapat Throwback video from film vajandaar goes viral on internet).

नुकताच उमेश- प्रियाचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, ते कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी चाहत्यांची संवाद साधताना त्यांनी ही गुडन्यूज शेअर करत, प्रर्थानांसाठी आणि शुभेच्छांसाठी सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत

लवकरच कामावर परतणार!

या लाईव्ह सेशन दरम्यान चाहत्यांनी दोघांनाही विविध प्रश्न विचारले होते. एका चाहत्याने त्यांना ‘आणि काय हवं ?’ या वेबसीरीजचे तिसरे पर्व नेमके कधी येणार याविषयी विचारले होते. तेव्हा लवकरच या सीरीजचे उरलेले चित्रीकरण पूर्ण करणार असल्याचे उमेशने आणि प्रियाने सांगितले, असून लवकरच ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने म्हटले आहे. प्रिया-उमेशने यावेळी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली, इतरांनीही कोणती काळजी घ्यायला हवी, याची देखील माहिती दोघांनी दिली. कोरोनातून बरे झाल्यानंतर लवकरच योग्य ती काळजी घेऊन दोघेही कामाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

(Priya Bapat Throwback video from film vajandaar goes viral on internet)

हेही वाचा :

कोरोनामुळे गर्भवती महिला पत्रकाराचा मृत्यू, धक्क्याने वडीलही कोमात, बॉलिवूडकरांनी दिला मदतीचा हात!

Rhea Chakraborty | सुशांतच्या मृत्युनंतर रिया चक्रवर्तीने धरलाय ‘या’ अभिनेत्याचा हात, एकत्र एन्जॉय करतायत पार्टी!