शाहरुख खानची ती वस्तू प्रियांका आजही सांभाळून ठेवते; अफेअरबद्दलही केला होता हा खुलासा?
प्रियांका चोप्रा आणि शाहरूख खान यांच्या नात्याची चर्चा अनेकदा झाली असेल. पण शाहरूखने कधीही त्यावर उघडपणे भाष्य केलं नाही. पण प्रियांकाने मात्र नक्कीच नकळत शाहरूख आणि तिच्या नात्याचा खुलासा एका शोमध्ये केला होता. काय म्हणाली होती प्रियांका जाणून घेऊयात.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची चर्चा आजही केली जाते. अशीच एक जोडी म्हणजे शाहरूख खान आणि प्रियांका चोप्रा. असे म्हटले जाते कि प्रियांका चोप्रा आणि शाहरूख खान यांच्यात प्रेमाचे नाते फुलले होते. प्रियांका चोप्रा विवाहित शाहरूखच्या प्रेमात होती. त्यांच्याबद्दल अनेक चर्चाही होऊ लागल्या होत्या. तसेच त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. पण अचानक प्रियांका बॉलिवूडमधून गायब झाली. त्याचं कारण सांगितलं गेलं गौरी खान. कारण जेव्हा शाहरूख आणि प्रियांकाबद्दल जेव्हा समजलं तेव्हा बरेच वादही झाल्याचं म्हटलं जातं. त्यानंतरच प्रियांका बॉलिवूडपासून दूर होऊन हॉलिवूडमध्ये गेली.
एका शोमध्ये प्रियांकाने स्वत: याबद्दल केला होता खुलासा
प्रियांका आणि शाहरूख खानने या विषयावर कधीही भाष्य केलं नाही. पण प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत तिच्या आणि शाहरूखच्या अफेअरबद्दलची नकळतपणे कबुली दिली होती. हॉलिवूड शो ‘ डर्टी लॉन्ड्री ‘ मध्ये तिचे अनेक गुपिते उघड केले होते. येथे तिने एका जॅकेटबद्दलही सांगितले होते. जे तिने अनेक वर्षांपासून तिच्याकडे सांभाळून ठेवले आहे. आणि हे जॅकेट तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रियांका अनेक वेळा ते जॅकेट परिधान करतानाही दिसली आहे .
- Priyanka Chopra Confirms Shah Rukh Khan Relationship
शोमध्ये शाहरूखच्या जॅकेटबद्दल प्रियांका काय म्हणाली होती?
प्रियांका चोप्राने टीव्ही शोमध्ये असेही म्हटले होते की तिच्या माजी प्रियकराने ते जॅकेट तिच्या घरी सोडले होते. प्रियांकाला ते इतके आवडले की तिने ते स्वतःकडेच ठेवले. ब्रेकअपनंतरही, जेव्हा प्रियांकाच्या एक्स प्रियकराने तिला ते जॅकेट परत करण्यास सांगितले तेव्हा तिने ते परत देण्यास नकार दिला.
- Priyanka Chopra
प्रियांका चोप्राने कुठेतरी स्वीकारले की शाहरूखच तिचा एक्स बॉयफ्रेंड होता
आता जॅकेटबद्दल जी गोष्ट समोर आली ती खूपच रंजक पद्धतीने आली. या शोमध्ये प्रियांका चोप्राने जॅकेटबद्दल केलेल्या खुलाशानंतर, एका ट्विटर वापरकर्त्याने तिला टॅग केले आणि लिहिले की, ‘प्रियंका चोप्राने अखेर जॅकेटची कहाणी सांगून शाहरुख खानसोबतच्या तिच्या नात्याची कबुली दिली तर.’ प्रियांका चोप्राला युजरची ही पोस्ट आवडली आणि तिने ती लाईकही केली. याचा अर्थ असा की प्रियांका चोप्राने कुठेतरी स्वीकारले आहे की शाहरुख तिचा एक्स प्रियकर होता. आणि युजरने ती गोष्ट ओळखली म्हणून तिने त्या पोस्टला लाईक केलं. प्रियांका चोप्राचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘बेवॉच’ अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील प्रियांकाच्या भूमिकेचे खूप कौतुकही झालं.
