
बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि आलिया या चर्चेत असलेल्या आणि टॉप अभिनेत्रींमध्ये येतात. आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडवर राज्य करत आहेत. आई झाल्यानंतर, दीपिका पदुकोण दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याशी झालेल्या वादामुळे चर्चेत आली.
आलिया, दीपिका नाही तर ही बॉलिवूड अभिनेत्री भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
दीपिका आणि आलिया हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. दीपिका पदुकोणने तिच्या कलकीसाठी 20 कोटी रुपये आणि शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेतले. त्यामुळे दीपिका ही सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे असाच ग्रह सर्वांचा होता. मात्र तसं नाहीये, तर आलिया, दीपिका नाही तर ही बॉलिवूड अभिनेत्री आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री.
4 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर तरी असते चर्चेत
ही बॉलिवूड अभिनेत्री आहे जी गेल्या 4 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे, पण ती इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. तिने तिच्या एका वेबसीरिजसाठी तब्बल 40 कोटी रुपये आणि तिच्या आगामी चित्रपटासाठी 30 कोटी रुपये इतके मानधन तिने आकारले आहे. ही 43 वर्षीय अभिनेत्री म्हणजे अर्थातच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा
सर्वांना मागे टाकत बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री बनली
प्रियांकाने सर्वांना मागे टाकत बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. नुकताच प्रियांकाने तिचा 43 वा वाढदिवस साजरा केला. प्रियांका चोप्राने अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या शो सिटाडेलसाठी 41 कोटी रुपये फी घेतली आहे.
30 कोटी रुपये मानधन
एसएस राजामौली यांच्या ‘एसएसएमबी29’ या चित्रपटासाठी प्रियांका चोप्राला 30 कोटी रुपये मानधन मिळाले आहे, जे आतापर्यंतच्या कोणत्याही महिला अभिनेत्रीसाठी सर्वाधिक मानधन आहे. यासह, ही देसी गर्ल बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. प्रियांका चोप्रा बॉलिवूड चित्रपट ‘द व्हाईट टायगर’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात ती राजकुमार राव, आदर्श गौरव सोबत दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता आणि बराच चर्चेतही आला होता. त्यानंतर फरहान अख्तरसोबत ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटही तिचा फार चालला होता.
त्यानंतर प्रियांका बॉलिवूडमध्ये परतलीच नाही. प्रियांका चोप्राने हॉलिवूडवर राज्य करायला सुरुवात केली आहे. प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती 650 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.