Priyanka Chopra | नाकाच्या सर्जरीदरम्यान प्रियांकासोबत घडली ‘ही’ घटना; बिघडला चेहरा, बऱ्याच वर्षांनंतर खुलासा

डॉक्टरांनी नंतर तिला आणखी एक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र या दुसऱ्या सर्जरीसाठी प्रियांका बरीच घाबरली होती. अशा वेळी तिच्या वडिलांनी तिला समजावलं आणि सर्जरीच्या वेळी ते तिच्यासोबत राहिले.

Priyanka Chopra | नाकाच्या सर्जरीदरम्यान प्रियांकासोबत घडली 'ही' घटना; बिघडला चेहरा, बऱ्याच वर्षांनंतर खुलासा
Priyanka ChopraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 2:20 PM

मुंबई : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने एका अशा घटनेचा उल्लेख केला, ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. एका सर्जरीदरम्यान प्रियांकाचा चेहराच बिघडला होता. बॉलिवूडमधील करिअर सुरू होण्याआधीच संपलंय, अशी भीती तिला वाटू लागली होती. या घटनेमुळे तिने नैराश्याचाही सामना केला. त्यातून सावरण्यासाठी प्रियांकाला बराच काळ लागला.

नुकतीच प्रियांका SiriusXM या शोमध्ये पोहोचली होती. या शोमध्ये ती तिच्या आयुष्यातील चढउतारांविषयी आणि करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. प्रियांकाने सांगितलं की तिच्या नाकाची सर्जरी बिघडली होती. त्यामुळे तिचा चेहरासुद्धा विचित्र दिसत होता. इतकंच नव्हे तर तिला श्वास घेतानाही त्रास जाणवत होता. डॉक्टरने प्रियांकाला सांगितलं होतं की तिचे नोज टिश्यू वाढले आहेत आणि त्यासाठी सर्जरी करावी लागेल. मात्र सर्जरीदरम्यान चुकून तिचा नोज ब्रिज कापला गेला होता. प्रियांकाने सांगितलं की हा तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता.

हे सुद्धा वाचा

सर्जरी बिघडल्याने प्रियांकाचा चेहरासुद्धा बराच बदलला होता. तिला दिवसरात्र फक्त तिच्या लूक्सची चिंता सतावत होती. त्यादरम्यान प्रियांकाला बऱ्याच प्रोजेक्ट्सवर पाणी सोडावं लागलं होतं. हे सर्व होत असताना प्रियांकाने नैराश्याचा सामना केला. तिने घराबाहेर पाऊल ठेवणंही बंद केलं होतं. माझं करिअर सुरू होण्याआधीच संपलंय, अशी भीती तिला सतावू लागली होती.

View this post on Instagram

A post shared by BVLGARI Official (@bulgari)

डॉक्टरांनी नंतर तिला आणखी एक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र या दुसऱ्या सर्जरीसाठी प्रियांका बरीच घाबरली होती. अशा वेळी तिच्या वडिलांनी तिला समजावलं आणि सर्जरीच्या वेळी ते तिच्यासोबत राहिले. वडिलांमुळेच त्या कठीण काळावर मात करू शकले, असं प्रियांका म्हणाली.

प्रियांका सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या हॉलिवूड सीरिजमुळे चर्चेत आहे. याशिवाय तिचा ‘लव्ह अगेन’ हा हॉलिवूड चित्रपटसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका तिच्या चित्रपटाचं आणि सीरिजचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय.

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.