Raveena Tandon: जंगल सफारीदरम्यान केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे रवीना अडचणीत; होणार चौकशी

| Updated on: Nov 30, 2022 | 9:37 AM

व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीदरम्यान रवीना टंडनने केलं असं काही, ज्याविरोधात अधिकाऱ्यांकडून होणार चौकशी

Raveena Tandon: जंगल सफारीदरम्यान केलेल्या त्या कृत्यामुळे रवीना अडचणीत; होणार चौकशी
Raveena Tandon
Image Credit source: Instagram
Follow us on

अमरावती: अभिनेत्री रवीना टंडनने नुकताच जंगल सफारीचा आनंद घेतला. या सफारीचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र याच सफारीच्या व्हिडीओमुळे ती अडचणीत सापडली आहे. सफारीदरम्यान रवीना वाघाच्या जवळ जात होती. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्याने दिली. सोशल मीडियावरील या व्हिडीओत रवीनाची जीप वाघाच्या जवळ जात असल्याचं पहायला मिळत आहे. कॅमेऱ्याच्या शटरचा आवाज येताच त्याच क्षणी वाघाच्या डरकाळीचाही आवाज व्हिडीओत ऐकायला मिळतोय.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर या घटनेप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे, असं वन उपविभागीय अधिकारी (SDO) धीरज सिंह चौहान म्हणाले. 22 नोव्हेंबर रोजी रवीनाने सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. यावेळी तिची जीप वाघाच्या जवळ गेली होती. वाहन चालक आणि त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून चौकशी केली जाईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

रवीनाने क्लिक केलेले फोटो आणि व्हिडीओ

रवीनाने सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये वाघाचे तिने काढलेले फोटोसुद्धा पहायला मिळत आहेत.

याच महिन्यात रवीना टंडनने भोपाळमधल्या वन विहार राष्ट्रीय उद्यानात काही बदमाशांनी वाघाजवळ केलेल्या दगडफेकीविषयी ट्विट केलं होतं. तिच्या या ट्विटनंतर उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला होता. ‘पर्यटक वाघाजवळ दगडी फेकत आहेत. सूचना दिलेल्या असतानाही तिथे जोरजोरात हसत आहेत, ओरडत आहेत. वाघांसाठी सुरक्षाच नाही’, असं लिहित तिने ट्विट केलं होतं. तिच्या या ट्विटचं उत्तर देताना उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करत असल्याचं सांगितलं होतं.