
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चांगलाच अडचणीत फसला. हेच नाही तर शाहरुख खानला बांगलादेशात पाठवण्याची जोरदार मागणी देखील केला जातंय. बांगलादेशात सतत हिंदूंवर अन्याय होत असताना शाहरुख खान त्याच्या एका निर्णयाने अडचणीत आला असून शाहरुख खान विरोधात लोकांमधील संताप वाढताना दिसतोय. भाजपाचे नेते संगीत सोम यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबद्दल केलेल्या विधानाने मोठा गदारोळ सुरू झाला. हिंदू महासभेच्या एका सदस्याने वादग्रस्त विधान केले. जिल्हाध्यक्ष मीरा राठोड यांनी शाहरुख खानची जीभ कापणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या वादात BCCI चीही भूमिका महत्वाची आहे. बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिझुर रहमानमुळे शाहरुख खान वादात सापडला.
अभिनेता शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघासाठी बांगलादेशी खेळाडूला विकत घेण्याच्या निर्णयाविरोधात हिंदू महासभेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडूला खरेदी केल्याने लोकांमध्ये मोठा रोष बघायला मिळतंय. हा विरोध इतका जास्त वाढला की, शाहरुख खान याला बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली जातंय.
दिनेश फलाहारी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले की, शाहरुख खानला बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराची माहिती आहे. मात्र, त्यानंतरही त्याने बांगलादेशी क्रिकेटपटू रहमानला लाखो रुपये देऊन विकत घेतले आहे. हेच नाही तर शाहरुख खान याचे संबंध बांगलादेशातील दहशतवाद्यांसोबतही असून शकतात, असे त्यांनी पत्रात म्हटले. देशातील शाहरुख खानसारख्या सर्व व्यक्तींची यादी तयार करून त्यांना बांगलादेशात पाठवले जावे, असेही त्यांनी म्हटले.
शाहरुख खान याने त्याच्या संघात बांगलादेशी खेळाडू घेतल्याने रोष वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार वाढला असून हिंदूंवर प्रचंड अन्याय होत आहे. कट्टरपथांकडून हिंदूंची भर रस्त्यावर हत्या केली जात आहे. दीपू नावाच्या हिंदू युवकाची भर रस्त्यावर हत्या बांगलादेशात झाल्यानंतर अनेक कलाकारांनी याचा निषेध केला. यादरम्यान शाहरुख खान याने त्याच्या संघात बांगलादेशी खेळाडूंना घेतल्याने लोकांचा रोष वाढताना दिसतोय.