AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : जगासाठी अत्यंत धक्कादायक बातमी… ट्रम्प यांचे हात अचानक पडले निळे; चर्चांना उधाण, अमेरिकेत खळबळ..

सध्या 79 वर्षांचे असलेले ट्रम्प हे अमेरिकेचे दुसरे सर्वात वयस्कर अध्यक्ष आहेत. त्यांच्या पूर्वी, डेमोक्रॅटिक अध्यक्ष जो बायडेन यांनी हे पद सोडलं तेव्हा 82 वर्षांचे होते. त्यांच्यानंतर ट्रम्प यांचाच नंबर लागतो. ट्रम्प यांच्या हातावर अलीकडेच काही निशाण आढळले..

Donald Trump : जगासाठी अत्यंत धक्कादायक बातमी… ट्रम्प यांचे हात अचानक पडले निळे; चर्चांना उधाण, अमेरिकेत खळबळ..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दल चर्चांना उधाण
| Updated on: Jan 02, 2026 | 9:01 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांनी घेतलेल निर्णय, त्यांच्या पॉलिसीज असो की इतर देशांवर लादलेला टॅरिफ गेल्या वर्षभरापासून ट्रम्प हे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असलेले पहायला मिळालं. नवीन वर्षातही हा सिलसिला कायम आहेच, पण यावेळी ट्रम्प त्यांच्या निर्णयांमुळे, राजकारणामुळे नव्हे तर त्यांच्या तब्येतीमुळे प्रकाशझोतात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दलच्या चर्चा पुन्हा वेगाने सुरू झाल्या आहेत. 79 वर्षांचे ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवणारे दुसरे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. त्यांच्या पूर्वी, डेमोक्रॅटिक अध्यक्ष जो बायडेन यांनी हे पद सोडलं तेव्हा 82 वर्षांचे होते. त्यांच्यानंतर ट्रम्प यांचाच नंबर लागतो. दरम्यान, ट्रम्प यांच्या हातावर अलीकडेच काही निशाण, निळसर जखमा (ब्रूज) आढळून आल्या आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं, मात्र ते पाहताच ट्रम्प यांनी स्वत: पुढे येऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स दिले आहेत. आपण एकदम फिट असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

त्यांच्या हातावर दिसणारे निळे डाग (जखम) हे कोणत्याही पडण्यामुळे किंवा आरोग्य समस्येमुळे नाहीत, तर दररोज घेत असलेल्या ॲस्पिरिन औषधामुळे हे झालं आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. एका जाहीर सभेत ट्रम्प झोपी गेल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र ट्रम्प यांनी आता ते देखील नाकारलं आहे.

तब्येतीबद्दल काय म्हणाले ट्रम्प ?

सध्या 79 वर्षांचे असलेले ट्रम्प हे अमेरिकेचे दुसरे सर्वात वयस्कर अध्यक्ष आहेत. माझी तब्येत पूर्णपणे ठीक आहे असं त्यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तसेच आपल्या तब्येतीबद्दल सतत होणाऱ्या चर्चांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्या हातांवर असलेले निळे डाग (जे कधीकधी मेकअपने झाकलेले दिसतात) तसेच त्यांचे सुजलेले घोटे याबद्दल अलिकडच्या आठवड्यात, मीडिया रिपोर्ट्समधून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर ट्रम्प यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. रक्त पातळ करण्यासाठी ते दररोज ॲस्पिरिन घेतात, त्यामुळे असे निशाण दिसतात, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.

कशामुळे होतात जखमा ?

आपल्या प्रकृतीबद्दल काही प्रश्न वारंवार विचारले जातात, त्याबद्दल ट्रम्प स्पष्टपणे बोलले. चला तब्येतीबद्दल 25 व्यांदा बोलूया, असं उपरोधिकपणे ते म्हणाले. आपल्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची बिघाड झाल्याचे ट्रम्प यांनी नाकारलं आणि राष्ट्रपती म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असंही त्यांनी सांगितलं. ” ॲस्पिरिन ( हे औषध) रक्त पातळ करण्यासाठी चांगले आहे आणि मला माझ्या हृदयातून घट्ट रक्त वाहू द्यायचं नाहीये.. मला माझ्या हृदयातून चांगले, पातळ रक्त वहायला हवं आहे,” असं ट्रम्प म्हणाले.

जेव्हा माझ्या हाताला दुखापत होते तेव्हा त्यावर मेकअप किंवा पट्टी लावतो असंही रिपब्लिकन अध्यक्ष म्हणाले. त्यांच्या हातांवरील निळ्या डागांबद्दल ते खुलेपणाने बोलले. हाय-फाइव्ह देत असताना त्यांचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांची अंगठी त्यांच्या हाताच्या मागच्या बाजूला लागली तेव्हा हे घडल्याचं त्यांनी सांगितलंय.

भरसभेत लागली झोप ?

ट्रम्प यांना सार्वजनिक मंचावर डोळे उघडं ठेवणं मुश्किल झाल्याचं बऱ्याचदा दिसून आलं आहे, त्यामध्ये ओव्हल ऑफीसच्या मीटिंगचाही समावेश होते. मात्र ट्रम्प यांनी हे दावेही फेटाळून लावले. मला कधीच जास्त झोप येत नाही, असं ते म्हणाले. मी जेव्हा झोपेत आढळलो, ते माझ्या विश्रांतीचे क्षण होतं असं म्हणत त्यांनी झोप लागल्याचे दावे फेटाळाले. “मी फक्त माझे डोळे बंद करतो. ते मला खूप आरामदायी वाटतं ” असंही त्यांनी सांगितलं. ट्रम्प यांच्याबद्दलच्या या बातम्या अशा वेळी आल्या आहेत आणि तेव्हाच त्यांना त्यांच्या भूतकाळातील विधानांची आठवण करून दिली जात आहे. तेव्हा त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना “स्लीपी” म्हणून त्यांची वारंवार खिल्ली उडवली होती.

अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.