Team India : टीम इंडियाला मिळणार नवा कोच ? हा दिग्गज सांभाळणार जबाबदारी
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड मोठा निर्णय घेत टीम इंडियामध्ये मोठा बदल करणार आहे. भारतीय क्रिकेट संघाला आता नवा कोच मिळणार आहे. इंग्लंडचा दिग्गज खेळाडू आता ही जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाबाबत (Team India) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघाला नवीन कोच मिळणार आहे. भारतीय संघात लवकरच एक नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोचची एंट्री होणार आहे. महिला प्रीमियर लीग (WPL 2026) नंतर या कोचची नियुक्ती केली जाईल. इंग्लंडच्या एका अनुभवी खेळाडूवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. WPL 2026 नंतर भारतीय महिला क्रिकेट संघ (India womens team) हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. याच दौऱ्यापासून संघाना एक नवा स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच मिळेल.
टीम इंडियासाठी नवा कोच
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडच्या निकोलस ली यांची संघाचे नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 च्या महिला प्रीमियर लीगच्या समाप्तीनंतर ते संघात सामील होतील. या वर्षीची WPL येत्या 9 जानेवारीपासून सुरू होणार असून ती 5 फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यानंतर लगेचच, भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे 15 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान विविध फॉरमॅटमधील मालिका खेळल्या जाणार आहेत. “डब्ल्यूपीएलनंतर, निकोलस ली हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक अर्आथत कोच म्हणून पदभार स्वीकारतील,” अशी माहिती एका सूत्राने पीटीआयला दिली..
निकोलसकडे मोठा अनुभव
निकोलस ली यांना क्रिकेट आणि एलीट स्पोर्ट्समध्ये व्यापक अनुभव आहे. ते माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असून, त्यांनी 13 सामन्यांमध्ये 490 धावा केल्या आहेत. त्यांनी अलीकडेच यूएईच्या आयएलटी20 लीगमध्ये गल्फ जायंट्स संघासोबत काम केले आहे. त्यांनी यापूर्वी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंत अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून काम पाहिले होते. मार्च 2020 ते जानेवारी 2024 पर्यंत त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डात फिजिकल परफॉर्मन्स हेड म्हणूनही काम पाहिले. ऑक्टोबर 2015 ते मार्च 202- पर्यंत ते श्रीलंका पुरूष संघासोबत जोडलेले होते.
स्थानिक पातळीवर, ली यांनी मार्च 2012 ते सप्टेंबर 2016 पर्यंत ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आणि त्यापूर्वी जानेवारी 2010 ते मार्च 2012 पर्यंत सहाय्यक प्रशिक्षक होते. ते अँग्लिया रस्किन विद्यापीठाची पदवीधर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ली यांची नियुक्ती भारतीय महिला संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या कौशल्यामुळे संघाच्या तंदुरुस्ती आणि कामगिरीमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
