प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक; ‘या’ कारणामुळे मोठी कारवाई

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. राहत फतेह अली खान यांना नुकताच अटक करण्यात आलीये. आता एक प्रकरण चांगलेच भोवताना राहत फतेह अली खान यांना दिसत आहे. दुबईत त्यांना अटक करण्यात आलीये.

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक; या कारणामुळे मोठी कारवाई
rahat fateh ali khan
| Updated on: Jul 22, 2024 | 6:54 PM

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्यावर अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलीये. हेच नाहीतर राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आलीये. यामुळे आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. राहत फतेह अली खान यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. असे सांगितले जात आहे की, राहत फतेह अली खान यांच्या माजी मॅनेजरने तक्रार केली होती. आता त्याच प्रकरणात ही अटक झालीये. याप्रकरणात अजून मोठे खुलासे होऊ शकतात. राहत फतेह अली खान यांचे माजी मॅनेजर सलमान अहमदने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

राहत फतेह अली खान हे त्यांच्या एका संगीत कार्यक्रमासाठी दुबईला गेले असता त्यांना तिथेच अटक करण्यात आलीये. रिपोर्टनुसार राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावरच अटक करण्यात आलीये. राहत फतेह अली खान यांना यूएईमध्ये बुर्ज दुबई पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे देखील होऊ शकतात. माजी मॅनेजर आणि राहत फतेह अली खान यांच्यात काय वाद होता आणि कोणता गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. याबद्दल फार काही माहिती अजून मिळाली नाहीये. राहत फतेह अली खान हे नेहमीच दुबईला त्यांच्या शोमुळे जातात. 

राहत फतेह अली खान यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. त्यांचा चाहतावर्ग फक्त पाकिस्तानमध्ये नाहीतर विदेशातही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे राहत फतेह अली खान हे चांगल्याच मोठ्या वादात सापडले होते. 

राहत फतेह अली खान यांच्यावर त्यावेळी जोरदार टीका देखील करण्यात आली होती. राहत फतेह अली खान यांचा शिष्याला चपलाने मारतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसला. त्यावर ते थेट म्हणाले होते की, माझे वडील तर मला दगडाने मारायचे. त्यानंतर ते सर्व प्रकरणावर सारवासारव करताना देखील दिसले होते. त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती.