‘हा तर मोठा जोक’; भारत जोडो यात्रेतील स्वरा भास्करच्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

| Updated on: Dec 01, 2022 | 11:00 AM

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेस स्वरा भास्कर; फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

1 / 5
अभिनेत्री स्वरा भास्करने गुरुवारी मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'त सहभाग घेतला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी पूजा भट्ट, रिया सेन आणि रश्मी देसाई यांनीसुद्धा भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता.

2 / 5
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरही हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. 'आज प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर भारत जोडो यात्रेचा एक भाग बनली. समाजातील प्रत्येक वर्गाच्या उपस्थितीने या यात्रेला यशस्वी बनवलं आहे', असं कॅप्शन देत हा फोटो पोस्ट करण्यात आला.

3 / 5
मात्र याच कॅप्शनमुळे अनेकांनी स्वराला ट्रोल केलंय. 'खरंच प्रसिद्ध आहे का', अशी उपरोधिक टिप्पणी एकाने केली. तर 'प्रसिद्ध की कुख्यात' असं दुसऱ्याने म्हटलंय. स्वरा भास्कर नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि ट्विट्ससाठी ओळखली जाते. अनेकदा तिला यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

4 / 5
'जिथे स्वरा भास्कर आहे, तिथे प्रसिद्धी होऊच शकत नाही', अशीही टिप्पणी एका युजरने केली. गेल्या महिन्यात रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी या अभिनेत्रींनीही भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता.

5 / 5
7 सप्टेंबरपासून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली. तमिळनाडूतील कन्याकुमारी इथून या यात्रेला सुरुवात झाली. त्यांनी आतापर्यंत तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ही यात्रा पूर्ण केली आहे.