AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens T20 World Cup: पहिल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, भारत-पाकिस्तान विरुद्ध भिडणार, पहिला सामना कधी?

Icc Womens T20 World Cup 2026: आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Womens T20 World Cup: पहिल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, भारत-पाकिस्तान विरुद्ध भिडणार, पहिला सामना कधी?
Netherlands vs Bangladesh WomenImage Credit source: GETTY
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 06, 2026 | 11:08 PM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत अवघ्या काही महिन्यांपूर्वी टी 20I वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर आता जून महिन्यांपासून वुमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं 12 जून ते 5 जुलै दरम्यान टी 20 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा इंग्लंडकडे आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ भिडणार आहेत. या स्पर्धेसाठी आतापर्यंत काही देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघाची घोषणा केली. त्यानंतर आता आणखी एक टीमची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. तसेच 26 वर्षीय खेळाडू या संघाचं नेतृत्व करणार आहे. ही कोणती टीम आहे हे जाणून घेऊयात.

नेदरलँड्स टीमची वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची ही यंदाची पहिलीच वेळ असणार आहे. बाबेट डी लीड नेदरलँड्सचं नेतृत्व करणार आहे. तसेच नेदरलँड्स वुमन्स टीम वर्ल्ड कपआधी ट्राय सीरिज खेळणार आहे. या ट्राय सीरिजमध्ये नेदरलँड्ससह, बांग्लादेश आणि स्कॉटलँडचा समावेश असणार आहे.

एकूण 4 संघांनी क्वालिफायरद्वारे वुमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलंय. या 4 संघांमध्ये नेदरलँड्सचाही समावेश आहे. नेदरलँड्सने क्वालिफायर स्पर्धेनंतर जाहीर करण्यात आलेल्या संघात 2 बदल केले आहेत. रोसाली लॉरेन्स आणि लारा लीमुईश या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच स्टेरे कॅलिस हीचाही समावेश करण्यात आला आहे.

कोणती टीम कोणत्या ग्रुपमध्ये?

नेदरलँड्सचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए ग्रुपमध्ये तगड्या संघांचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये नेदरलँड्स व्यतिरिक्त टीम इंडिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा समावेश आहे. नेदरलँड्स या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 14 जून रोजी खेळणार आहे.

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी नेदरलँड्स टीम : बाबेट डी लीडे (कर्णधार), कॅरोलिन डी लँग, फ्रेडरिक ओवरडिज्क, हन्ना लँडहीर, हीदर सीजर्स, आयरिस ज्विलिंग, इसाबेल वान डेर वोनिंग, लारा लीमहुइस, मायरथे वान डेन राड, फेबे मोल्केंबोएर, रॉबिन रिज्के, रोजाली लॉरेन्स (विकेटकीपर), सान्या खुराना, सिल्वर सीजर्स आणि स्टर्रे कालिस.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला