AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर घुमला शिवरायांचा जयघोष; ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा सर्वांत मोठा विक्रम

'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कोटी रुपये कमावले, ते जाणून घ्या..

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर घुमला शिवरायांचा जयघोष; 'राजा शिवाजी' चित्रपटाचा सर्वांत मोठा विक्रम
Raja ShivajiImage Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2026 | 2:02 PM
Share

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील ही मोठी कामगिरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट 1 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या 24 दिवसांत या चित्रपटाने भारतात 101.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाईने ओपनिंग करण्याचा, ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करण्याचा आणि एका दिवसातील मराठीतील सर्वाधिक कमाई करण्याचाही विक्रम आपल्या नावे केला आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीसुद्धा रितेशनेच सांभाळली आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन (भारत, नेट कलेक्शन)

पहिला आठवडा- 57.70 कोटी रुपये दुसरा आठवडा- 27.00 कोटी रुपये तिसरा वीकेंड- 8.40 कोटी रुपये

तिसरा आठवडा + चौथा वीकेंड

18 वा दिवस (सोमवार)- 1.25 कोटी रुपये 19 वा दिवस (मंगळवार)- 1.45 कोटी रुपये 20 वा दिवस (बुधवार)- 1.20 कोटी रुपये 21 वा दिवस (गुरुवार)- 0.95 कोटी रुपये 22 वा दिवस (शुक्रवार)- 0.70 कोटी रुपये 23 वा दिवस (शनिवार)- 1.35 कोटी रुपये 24 वा दिवस (रविवार)- 1.40 कोटी रुपये भारतातील नेट कलेक्शन- 101.40 कोटी रुपये

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश करणार, हे आधीपासूनच निश्चित नव्हतं. या चित्रपटावर रितेश गेल्या दहा वर्षांपासून काम करत होता. दिग्दर्शनाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेण्याआधी त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या दिग्दर्शकांकडे विचारणा केली होती. “2016 मध्ये आधी माझे मित्र आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत या चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यावेळी ते दिग्दर्शन करणार होते. दुर्दैवाने काही गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि तो चित्रपट रखडला. तीन वर्षांनंतर 2019 मध्ये नागराज मंजुळे यांच्यासोबत मी ‘राजा शिवाजी’ चित्रपट बनवण्यासाठी हातमिळवणी केली. तेव्हासुद्धा आम्ही घोषणा केली, पण नेमका कोविड आला. त्यानंतर काही वर्षे अशीच गेली आणि काहीच काम झालं नाही”, असा खुलासा रितेशने एका मुलाखतीत केला होता. गोष्टी जमून न आल्याने अखेर रितेशनेच दिग्दर्शन करायचं ठरवलं.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ