AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jailer | रजनीकांत यांचा ‘जेलर’ तोडणार पठाणचा रेकॉर्ड ? बॉक्स ऑफीसवर करणार तगडी कमाई ?

सुपरस्टार रजनीकांत यांची पॅन इंडिया फिल्म 'जेलर' आज रिलीज झाली आहे. या चित्रपटाला भारताव्यतिरिक्त, अमेरिका, युरोप आणि दुबईतही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Jailer |  रजनीकांत यांचा 'जेलर' तोडणार पठाणचा रेकॉर्ड ? बॉक्स ऑफीसवर करणार तगडी कमाई ?
| Updated on: Aug 10, 2023 | 12:08 PM
Share

Jailer Box Office Prediction : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajanikant) यांच्याबद्दल चाहत्यांना प्रचंड वेड आहे. सुमारे दोन वर्षांनंतर ‘थलायवा’ यांचे पुनरागमन होत असल्याने चाहते खूपच खुश आहेत. आज रजनीकांत आणि तमन्ना भाटिया यांचा ‘जेलर(Jailer release) हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे शानदार ॲडव्हान्स बूकिंग (advance booking) पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डतोड कमाई करेल असा अंदाज व्यक्त होत आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगद्वारेच 35 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

रजनीकांत यांचे चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतात. रजनीकांत आणि तमन्ना भाटिया यांच्या ‘जेलर’ला दक्षिणेपासून ते परदेशापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत जेलरला बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, पहिल्या दिवशी फक्त तामिळनाडीमध्ये जेलरचे 20 कोटींचे ओपनिंग होऊ शकते.

‘जेलर’ चे ओपनिंग डे कलेक्शन

तसेच ग्लोबल कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट जगभरात 70 ते 80 कोटींची शानदार कमाई करू शकतो. ॲडव्हान्स बूकिंगद्वारे या चित्रपटाने भारतात सुमारे 20 कोटी रुपयांची कमाई केली असून ग्लोबल कलेक्शन 35 कोटींहून अधिक झाल्याचे समजते.

‘पठाण’चा रेकॉर्ड मोडणार का ?

रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाची साऊनमध्ये जबरदस्त क्रेझ आहे.मात्र कमाईच्या बाबतीच हा चित्रपट शाहरूख खानच्या पठाणला मागे टाकू शकेल का ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पठाण हा या वर्षातील भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. शाहरुख खानच्या पठाणने पहिल्या दिवशी जगभरात 106 कोटींची बंपर कमाई केली होती. केवळ भारतातच पठाणने 53 कोटी कमावले होते.

2 वर्षांनी रजनीकांत यांचे पुनरागमन

जेलर चित्रपटासह सुपरस्टार रजनीकांत हे दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात 72 वर्षांचे रजनीकांत हे 33 वर्षांच्या तमन्ना भाटियासह दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटात जॅकी श्रॉफ, राम्या कृष्णन, योगी बाबू आणि विनायक यांचीही भूमिका असेल. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि कन्नड स्टार शिवा राजकुमार यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे.

Follow Us
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...