ऐश्वर्या की रजनीकांतचा माजी जावई, कोण आहे अधिक श्रीमंत ? जाणून घ्या नेटवर्थ

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आता अधिकृतरित्या पती धुनषपासून विभक्त झाली आहे. प्रसिद्ध अभिनेता असलेल्या धनुषशी ऐश्वर्याने 2004 साली लग्न केलं. मात्र लग्नाच्या 20 वर्षानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले .

ऐश्वर्या की रजनीकांतचा माजी जावई, कोण आहे अधिक श्रीमंत ? जाणून घ्या नेटवर्थ
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 4:22 PM

Dhanush and Aishwarya Net Worth : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आता अधिकृतरित्या पती धुनषपासून विभक्त झाली आहे. प्रसिद्ध अभिनेता असलेल्या धनुषशी ऐश्वर्याने 2004 साली लग्न केलं. मात्र लग्नाच्या 20 वर्षानंतर आता ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत गेल्या अनेक वर्षांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहेत आणि ते खूप लोकप्रियही आहेत. ऐश्वर्या थलायवा रजनीकांत यांची मुलगी आहे, तर धनुष हा दक्षिणेसोबतच बॉलिवूडमध्येही यशस्वी अभिनेता आहे.

धनुष आणि ऐश्वर्या यांच्याकडे किती संपत्ती आहे, कोण अधिक श्रीमंत आहे जाणून घेऊया.

धनुषची कमाई आणि संपत्ती

– धनुष हा तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि महागडा अभिनेता आहे. एका चित्रपटासाठी तो 17 ते 20 कोटी रुपये घेतो. धनुषची एकूण संपत्ती 240 कोटी रुपये आहे. तो फक्त अभिनेताच नव्हे तर एक यशस्वी निर्माता, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक देखील आहे. त्याने कठोर परिश्रम करून करोडोंची संपत्ती कमावली आहे.

– धनुषच्या लोकप्रियतेमुळे त्याला ब्रँड प्रमोशनमध्येही मोठा फायदा मिळतो. यातून तो बक्कळ कमाई करतो.

– सेंटर फ्रेश, 7 अप आणि टाटा स्काय सारख्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय ब्रँडच्या जाहिरातींमध्ये धनुष दिसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष एका ब्रँडच्या प्रचारासाठी सुमारे 3 कोटी रुपये चार्ज करतो.

– 2010 साली धनुष आणि ऐश्वर्याने वंडरबार फिल्म्स नावाची निर्मिती आणि वितरण कंपनी सुरू केली. या प्रोडक्शन हाऊसने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटांमधून धनुषला भरपूर नफा मिळाला.

– या व्यतिरिक्त धनुष दिग्दर्शनातूनही पैसे कमावतो. तसेच गाण्यातूनही तो पैसे कमावतो. त्याने आत्तापर्यंत 50 हून अधिक चित्रपटांत काम केलंय .

धनुषचं आलिशान घर आणि गाड्यांचे कलेक्शन

– तामिळ स्टार धनुष चेन्नईमध्ये 25 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात राहतो. या आलिशान बंगल्यात अनेक आधुनिक आणि मौल्यवान वस्तू आहेत.

– धनुषकडे 7.95 कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट कार आहे. एवढंच नव्हे तर तो 3.40 कटी रुपयांच्या बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्परचा मालक आहे.

– त्याच्या कार कलेक्शनमध्ये 75 लाखांची फोर्डही आहे. तसेच 44 लाखांची जग्वार कारही त्याच्या मालकीची आहे.

ऐश्वर्या रजनीकांतचे नेटवर्थ

– साऊथचे सुपरस्टार असलेले रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हीसुद्धा संपत्तीच्या बाबतीत तिचा माजी पती धनुषपेक्षा कमी नाही.

– लग्नानंतर ऐश्वर्या रजनीकांतने तमिळ फिल्म इंडस्ट्रीत डायरेक्टर म्हणून एन्ट्री केली.

– मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या एका वर्षात चित्रपट दिग्दर्शनातून जवळपास 35 कोटी रुपये कमावते.

– ती फक्त प्रसिद्ध दिग्दर्शक नव्हे तर एक यशस्वी निर्माती आणि पार्श्वगायिका देखील आहे. यातून ती बक्कळ कमाई करते.

– ऐश्वर्या रजनीकांतची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये आहे.

– ती चेन्नईच्या एका पॉश एरिआत आलिशान घरात राहते. या सी-फेसिंग अपार्टमेंटची किंमत कोटयवधी रुपये आहे.

– चेन्नई व्यतिरिक्त ऐश्वर्याने इतर शहरांमध्येही अनेक आलिशान घरे खरेदी केली आहेत ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.

– ऐश्वर्या रजनीकांतच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझचा समावेश आहे ज्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे लाखोंचे दागिने आहेत.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.