भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम
राजकुमार हिरानी यांनी नुकतीच सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २३ वर्षांच्या कारकिर्दीत दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही, आमिर आणि शाहरुखसोबत काम केलेल्या हिरानींना 'दबंग' सलमानसोबत काम करण्याची अजूनही प्रतीक्षा आहे.

Rajkumar Hirani On Working With Salman Khan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खान ( Salman Khan ) हा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड गाजवतोय. त्याने आत्तापर्यंत कित्येत चित्रपट केले असून अनेक दिग्दर्शकांसोबतही काम केलं आहे. पण बॉलिवूडमधल्या एका नामवंत दिग्दर्शकासोबत मात्र सलमानची जोडी कधीच मोठ्या पडद्यावर दिसली नाही, त्यांचं नाव – राजकुमार हिरानी. गेल्या 23 वर्षांपासून राजकुमार हिरानी हे बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. 2003 साली आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृ्ष्टीत पदार्पण केलं. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी संजय दत्त, रणबीर कपूर, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या एकाहून एक मोठ्या स्टार्ससोबत काम केलंय. पण बॉलिवूडचा भाईजान, म्हणजेच सलमान खान याच्यासोबत त्यांचा एकही चित्रपट नाही. राजकुमार हिरानी आणि सलमान या दोघांनी आत्तापर्यंत एकाही प्रोजेक्टमध्ये काम केलेलं नाही, मात्र सलमानसोबत काम करण्याची इच्छा हिरानी यांनी नुकतीच बोलून दाखवली.
काय म्हणाले राजू हिरानी ?
अलीकडे एका वृत्तसंस्थेला हिरानी यांनी मुलाखत दिली, तेव्हा भविष्यात (तुम्ही) सलमान खानसोबत काम करण्याची शक्यता आहे का ?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर राजू हिरानी यांनी स्पष्टपणे सांगितलं की,’ मला सलमानसोबत काम करायला नक्कीच आवडेल. आमची कधी भेट झालेली नाही असं नव्हे, आम्ही काही वेळा भेटलोय ना. पण अजून अशी स्क्रीप्ट मिळालेली नाही, भविष्यात कधी असं घडलं, तर.. ‘ असं हिरानी म्हणाले.
योग्य स्क्रीप्टच्या शोधात
राजकुमार हिरानी यांच्या वक्तव्यावरून हे तर स्पष्ट होतं की दोघांनाही एकत्र काम करण्याची इच्छा आहे. त्या दोघांच्या आत्तापर्यंत काही भेटीही झाल्या, पण एकत्र येऊन काम करता येईल, अशी योग्य स्क्रीप्ट मिळालेली नाही. म्हणजेच भविष्यात जर अशी एखादी स्क्रिप्ट तयार झाली, जी सलमानलाही आवडेल आणि हिरानी यांनाही योग्य वाटेल, तर ते दोघे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
राजकुमार हिरानी यांनी आत्ताप्रयंत आमिर आणि शाहरुख या दोन खानांसोबत काम केलंय, फक्त सलमानसोबत नाहीत. त्यामुळे हे दोघे कधी एकत्र येतात का, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.
सलमान खानचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
सध्या चाहते सलमानच्या आगामी चित्रपटाची वाट पहात आहेत. वामशी पेडिपल्ली याचे दिग्दर्शक असून त्याचं नाव असून हा चित्रपट ॲक्शन ड्रामा असेल. अधिकृतपणे या चित्रपटाचं नाव अजून तरी जाहीर झालेलं नाही. पुढल्या वर्षी, 2027 साली हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो.