AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने शेअर केला कॉमेडियनचा कधीही न पाहिलेला Video

राजू श्रीवास्तव यांच्या आठवणीत पत्नी भावूक; Video शेअर करत लिहिलं...

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने शेअर केला कॉमेडियनचा कधीही न पाहिलेला Video
raju srivastava
| Updated on: Oct 23, 2022 | 8:25 PM
Share

मुंबई- कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी 21 सप्टेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला. राजू यांच्या निधनाच्या एक महिन्यानंतर त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. राजू यांचा कधी न पाहिलेला हा व्हिडीओ त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यासोबतच कॅप्शनमध्ये एक कविता लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. जिममध्ये व्यायाम करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

शिखा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव गाणं म्हणताना दिसत आहेत. 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वामी’ या चित्रपटातील गाणं ते गात आहेत. ‘तू जाऊन महिना झाला पण आम्हाला माहीत आहे की तू अजूनही आमच्यासोबतच आहेस आणि कायम राहशील’, असं कॅप्शन शिखा यांनी या व्हिडीओला दिला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेष लोढा, स्टँडअप कॉमेडियन एहसान कुरेशी आणि सुनील पाल यांनी एकत्र येऊन राज यांच्या आठवणीत एक शो केला होता. राजू यांचा भाऊ काजू श्रीवास्तव यांनीसुद्धा या शोमध्ये भाग घेतला होता.

राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना ताबडतोबत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं डॉक्टरांनी त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.