‘रामायण’मधील सीता दीपिका चिखलियाचा मॉडर्न लूक पाहून सर्वच थक्क, काहींनी तर जोडले हात, Video व्हायरल
'रामायण'मधील सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका चिखलिया आता कशी दिसते? व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क. सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं त्यांचं प्रचंड कौतुक.

दूरदर्शनवरील गाजलेल्या रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आजही चाहत्यांच्या मनात ‘सीता माता’ म्हणूनच ओळखल्या जातात. मालिकेच्या प्रसारणाला अनेक दशके लोटली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सीतेची प्रतिमा इतकी घट्ट जोडली गेली आहे की आजही चाहते त्यांना त्याच आदराने व प्रेमाने पाहतात.
अलीकडेच दीपिका चिखलिया सार्वजनिक ठिकाणी दिसल्या. यावेळी त्यांनी जीन्स, पांढरा शर्ट आणि काळा गॉगल असा साधा आणि फॉर्मल लूक परिधान केला होता. मात्र, त्यांचा आधुनिक पेहराव पाहूनही चाहत्यांच्या मनातील ‘सीता माता’ची प्रतिमा बदलली नाही. त्यांना पाहताच अनेक चाहत्यांनी हात जोडून नमस्कार केला.
सोशल मीडियावर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव
दीपिका यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. अनेकांनी त्यांना ओरिजिनल सीता माता असे म्हटले. तर काहींनी त्यांच्या साधेपणाचे आणि शांत व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले.
एका चाहत्याने, त्यांना पाहताच सीता मातांची सादगी आणि पवित्रता जाणवते अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी कमेंट्समध्ये हात जोडणारे इमोजी पोस्ट करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
‘सीता’ हीच माझी कायमची ओळख
सीतेच्या भूमिकेशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना दीपिका म्हणाल्या, लोक मला सीता म्हणूनच ओळखतात. ‘रामायण’पेक्षा अधिक लोकप्रिय काहीही असू शकत नाही. मग मी माझ्या प्रतिमेशी छेडछाड का करू? गेली 35 वर्षे मी सीतेची जबाबदारी जपली आहे. आता वेगळे काही बनण्याचा प्रयत्न का करावा? त्यांच्या या वक्तव्यातून त्या आपल्या सर्वात लोकप्रिय भूमिकेशी किती भावनिकरित्या जोडल्या गेल्या आहेत हे स्पष्ट होते.
आजही कायम आहे चाहत्यांच्या मनातील स्थान
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधील सीतेच्या भूमिकेमुळे दीपिका चिखलिया यांना मिळालेली लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. बदलत्या काळात अनेक कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या, मात्र दीपिकांनी आपल्या सर्वात लोकप्रिय भूमिकेशी असलेले नाते जपण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आजही लाखो चाहते त्यांना केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर ‘सीता माता’च्या रूपातच आदराने पाहतात.