AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अरे, तू यहां क्या कर रहा है?” फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये रणबीर कपूर अन् विकी कौशल या व्यक्तीला पाहून शॉकच झाले

रणबीर कपूर आणि विकी कौशल यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये या दोघांनाही प्रवास करताना पाहून सगळेच प्रवासी आश्चर्यचकित झाले. त्याचवेळी त्या फ्लाईटमध्ये एका व्यक्तीला पाहून रणबीर आणि विकी दोघेही शॉक झालेले दिसले. कोण होता तो व्यक्ती जाणून घेऊयात.

अरे, तू यहां क्या कर रहा है? फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये रणबीर कपूर अन् विकी कौशल या व्यक्तीला पाहून शॉकच झाले
Ranbir Kapoor, Vicky Kaushal were shocked to see this person while travelling in an economy flightImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2025 | 4:05 PM
Share

रणबीर कपूर सध्याच्या येणाऱ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. रणबीर कपूर सध्या त्याच्या शुटींगमध्ये खूप व्यस्त आहे. नितेश तिवारीच्या ‘रामायण’ पासून ते संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ पर्यंत, रणबीरकडे अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट आहेत. अलिकडेच रणबीरने नितेश तिवारीच्या ‘रामायण’चे शूटिंग पूर्ण केले आहे. ज्यामध्ये तो भगवान श्री रामांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता तो संजय लीला भन्साळींच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील त्याच्यासोबत दिसणार आहेत.

रणबीर कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

याच दरम्यान, रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि विकी एकाच फ्लाईटने तेही इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसले. तेव्हाचाच हा व्हिडिओ असून त्याला फ्लाईटमध्ये एक व्यक्ती दिसली ज्याला पाहून तो शॉकच झाला.

रणबीर कपूर कोणाला पाहून शॉक झाला?

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, रणबीर निळ्या रंगाचा हाफ शर्ट, पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. फ्लाइटमध्ये त्याच्या सीटकडे जाताना दिसत आहे. यादरम्यान, रणबीरची नजर एका व्यक्तीवर पडते. रणबीर त्या व्यक्तीला पाहताच म्हणताना दिसतोय की “अरे, तू इथे काय करत आहेस?” तर रणबीर ज्या व्यक्तीला पाहून शॉक झाला तो त्याच्याच चित्रपटाचा क्रू मेंबर होता. फ्लाईटमध्ये व्यक्तीला अचानक पाहून रणबीर आश्चर्यचकित झालेला दिसला.

रणबीर कपूरसोबत विकी कौशलही त्याच फ्लाईटमध्ये होता 

हा व्हिडिओ सोशल मीडियावरील रणबीरच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘रणबीर कोणासोबत शूटिंग करत होता हे विसरून गेला की काय आणि त्याला विचारतो – अरे तू इथे काय करतोय? कुठे जात आहेस.’ रणबीरचे चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा रणबीर राजस्थानमध्ये ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचे शूटिंग करून मुंबईला परतत होता आणि यावेळी विकी कौशल देखील त्याच्यासोबत त्याच फ्लाईटमध्ये उपस्थित होता.

विकी देखील रणबीरसोबत इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला

रणबीरसोबत विकी कौशल देखील इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला.विकीने देखील त्या क्रू मेंबरची विचारपूस केली. विकीने त्याला विचारले- ‘कसा आहेस? आम्हाला टीझर खूप आवडला.’ दरम्यान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांना इकॉनॉमी क्लासमध्ये पाहून प्रवासी देखील आश्चर्यचकित झाले आणि मागे वळून पाहू लागले.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.