‘मी अमिताभसोबत लग्न केलं असतं, त्यांची पूजा केली असती’, राणी मुखर्जी थेटच बोलली
राणी मुखर्जीन एका मुलाखतीत तिचा स्वप्नांचा राजकुमार हे बिग बींसारखा हवा असं थेट म्हटलं. एवढंच नाही तर राणीला अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं तिने स्पष्ट केले. तिचे वक्तव्य फारच चर्चेत आलं होतं.

राणी मुखर्जीने तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि दमदार आवाजामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत एक खास ओळख निर्माण केली आहे. स्त्री प्रधान चित्रपटांसाठी विचार केला जाणाऱ्या अभिनेंत्रींपैकी एक आहे. राणी मुखर्जी सुरुवातीपासूनच एका फिल्मी कुटुंबाशी संबंधित आहे. तिची आई कृष्णा मुखर्जी ही पार्श्वगायिका होत्या तर अभिनेत्रीचे दिवंगत वडील राम मुखर्जी चित्रपट दिग्दर्शक होते. राणी सुरुवातीपासूनच अमिताभ बच्चन, श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि आमिर खान सारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींची चाहती आहे. राणीला बिग बीं बद्दल विशेष आवड आहे. तिला अमिताभ बच्चन एवढे आवडतात की तिला चक्क त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा होती.
अमिताभ-राणी यांनी या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे
राणीला तिचा आवडता अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधीही मिळाली. राणी आणि अमिताभ यांनी ‘वीर-जारा’, ‘ब्लॅक’, ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘बाबुल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या अभिनेत्रीने बिग बींच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये कॅमिओ देखील केला होता.
तर मी अमिताभ यांच्याशी लग्न केलं असतं
राणी मुखर्जी ही बिग बींची खूप मोठी चाहती आहे.तिने वारंवार अनेक माध्यमांतून बोलूनही दाखवलं आहे. एकदा सिमी गरेवालच्या टॉक शोमध्ये राणीला जेव्हा तिच्या स्वप्नांचा राजकुमार कसा हवा आहे असं विचारलं असता तिने थेट अमिताभ यांचं नाव घेतलं. तसेच तिला त्यांच्याशी लग्न करण्याचीही इच्छा होती असंही तिने सांगितलं आहे. ती म्हणाली होती, जर तिला संधी मिळाली असती तर तिने नक्कीच अमिताभ बच्चनशी लग्न केले असते.
View this post on Instagram
राणीलाही बिग बींची पूजा करायची होती
याशिवाय राणीने असेही म्हटले की तिच्या मनात अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खूप आदर आहे. तसेच तिला तिने त्यांची पूजा केली असती. राणी आणि अमिताभ यांच्या वयात 35 वर्षांचा फरक आहे. तिच्या मनात अमिताभ यांच्याबद्दल जे प्रेम आहे तो एक आदर आहे.
