चाहत्यांच्या गर्दीतून रणवीरने वाचवला चिमुकल्याचा जीव; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

गर्दीत अडकलेल्या चिमुरड्याला रणवीरने खांद्यावर उचलून घेतलं; Video पाहून नेटकरी म्हणाले..

चाहत्यांच्या गर्दीतून रणवीरने वाचवला चिमुकल्याचा जीव; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 13, 2022 | 12:58 PM

मुंबई: अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एका कार्यक्रमादरम्यान गर्दीत रडणाऱ्या चिमुकल्या मुलाला त्याने उचलून घेतलं. चाहत्यांच्या गर्दीत त्याला कोणतीही धक्काबुक्की होऊ नये, म्हणून सुरक्षेखातर त्याने मुलाला खांद्यावर उचलून घेतलं. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. रविवारी मालाड इथल्या एका कार्यक्रमाला त्याने हजेरी लावली होती. एका फ्लॅन क्लबने इन्स्टाग्रामवर त्याचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत रणवीरच्या आजूबाजूला चाहत्यांची गर्दी पहायला मिळतेय. रणवीरच्या पुढे दिग्दर्शक रोहित शेट्टीही आहे. अचानक रणवीर मागे वळतो आणि एका लहान मुलाला खांद्यावर उचलून घेतो. त्याला उचलूनच रणवीर पुढे चालू लागतो. हा व्हिडीओ पाहून चाहते रणवीरची प्रशंसा करत आहेत.

रणवीरचा ‘सर्कस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मा आणि पूजा हेगडे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. रणवीरची पत्नी दीपिका पदुकोण यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. रणवीर आणि दीपिकाचं ‘करंट लगा’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. शेक्सपिअर यांच्या ‘अ कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकावर ‘सर्कस’ हा चित्रपट आधारित आहे.

सर्कसनंतर रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या भूमिका आहेत.