Video : रश्मिका मंदाना हिच्या ‘त्या’ व्हिडीओवर चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव, अभिनेत्रीचा लूक
रश्मिका मंदाना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. चाहते हे रश्मिका मंदाना हिच्या पुष्पा 2 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. रश्मिका मंदाना हिने काही दिवसांपूर्वीच एक खास पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने चित्रपटाबद्दल मोठे अपडेट दिले.

मुंबई : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही कायमच चर्चेत असते. रश्मिका मंदाना हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. रश्मिका मंदाना ही सध्या तिच्या आगामी पुष्पा 2 या चित्रपटामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. रश्मिका मंदाना या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्यासोबत धमाका करताना दिसेल. विशेष बाब म्हणजे रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांचा पुष्पा हा चित्रपट हिट ठरला. नुकताच पुष्पा 2 चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आलीये. पुष्पा 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.
चाहते हे आतुरतेने पुष्पा 2 चित्रपटाची वाट पाहत आहेत. पुष्पा 2 हा चित्रपट 15 आॅगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पुष्पा हा चित्रपट सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे कोरोनाच्यानंतर या चित्रपटाने धमाका केला. पुष्पा 2 चित्रपटाचे अनेक पोस्टरही रिलीज झाली. काही दिवसांपूर्वीच पुष्पा 2 चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो रश्मिका मंदाना हिने शेअर केले.
आता नुकताच रश्मिका मंदाना ही तिच्या एक व्हिडीओमुळे तूफान चर्चेत आलीये. रश्मिका मंदाना हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे देखील बघायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदाना ही वर्कआऊट करताना दिसत आहे. रश्मिका मंदाना हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या जिममधील आहे. जो आता चांगलाच व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ शेअर करताना रश्मिका मंदाना ही आपल्या जिम ट्रेनरचे काैतुक करताना देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदाना पायांचा व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रश्मिका मंदाना हिने लिहिले की, हा व्हिडिओ माझ्या जिम ट्रेनरने शूट केला आहे. हार्ड वर्क करून शरीरातून बाहेर पडल्याची भावना देते, हळूहळू तो मला एका सुपर ह्युमनच्या व्यक्तिरेखेत बदलत आहे.
View this post on Instagram
आता रश्मिका मंदाना हिने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे रश्मिका मंदाना हिच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. रश्मिका मंदाना हिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडला आहे. रश्मिका मंदाना ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देते.
रश्मिका मंदाना हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, तुला मेकअप करण्याची काय गरज आहे? दुसऱ्याने लिहिले की, आज मला तुमच्या फिटनेसचे राज कळाले. रश्मिका मंदाना हिने अत्यंत कमी वेळामध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली. रश्मिका मंदाना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
