AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हात भरून बांगड्या,भांगेत कुंकू अन् कांजीवरम साडी;आमिरसोबत फोटो काढताना रेखा यांनी डोक्यावरून पदर पडू दिला नाही

'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात जवळपास सर्वच बॉलिवूडमधील स्टार उपस्थित होते. यावेळी लक्ष वेधून घेतलं ते फक्त रेखा यांनी. या कार्यक्रमात त्यांच्या खास लूकने सर्वांनाच घायाळ केलं होतं. सर्व कॅमेरे फक्त त्यांच्याकडेच होते.

हात भरून बांगड्या,भांगेत कुंकू अन् कांजीवरम साडी;आमिरसोबत फोटो काढताना रेखा यांनी डोक्यावरून पदर पडू दिला नाही
Rekha Elegance lookImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 20, 2025 | 1:45 PM
Share

आजही अभिनेत्री रेखा त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मानवर राज्य करतात. विशेषत: त्यांच्या साड्या आणि दागिने त्यांच्या सौंदर्याचं मुख्य आकर्षण असतं.जेव्हा त्या सुंदर आणि वेगवेगळ्या पॅटर्नची साडी घालतात तेव्हा सर्वांच्या नजरा फक्त त्यांच्यावर खिळलेल्या असतात. रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा. तेव्हाही रेखा कांजीवरम साडीत जेव्हा कार्यक्रमात आल्या तेव्हा सर्व कॅमेरे त्यांच्याकडे वळाले.

‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात रेखा यांचा खास लूक

हात भरून बांगड्या,भांगेत कुंकू, सोनेरी आणि काळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी, दागिने असा शृंगार रेखा यांनी केला होता. त्यांनी आमिर खानसोबत खूप पोज दिल्या. एवढंच नाही तर आमिर खानसोबत पोज देत असताना रेखा यांनी अजिबात त्यांच्या डोक्यावरील पदर खाली पडू दिला नाही. जेव्हा जेव्हा पदर डोक्यावरून घसरत होता तेव्हा तेव्हा त्या पदर पुन्हा डोक्यावर घेत होत्या. हे पाहून आमिरला देखील त्यांचे कौतुक वाटत होते. वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा यांची ही सुंदरता, शालिनता तशीच आहे.

रेखा यांना पाहताच सर्व कॅमेरे फक्त त्यांच्याकडे होते 

पुरस्कार सोहळा असो किंवा एखाद्या स्टारचे लग्न, रेखा नेहमीच साडीत एक सुंदर लूक देताना दिसतात. साडीसह त्यांच्या ब्लाउजची स्टाईलही अगदी साधी पण फारच आकर्षक असते. जसं की साडीसोबत कोणत्याही प्रकारचे भरतकाम किंवा हेवी वर्क न करता साधा काळा ब्लाउज त्यांनी घातलेला दिसतो. ब्लाउजची चमक रेखा यांच्या लूकचे सौंदर्य द्विगुणित करत आहे.रेखा यांच्या साड्या आणि त्यावर त्या करत असलेला शृंगार इतका मनमोहक असतो की कित्येक नवीन अभिनेत्री त्यांच्या या लूकला फॉलो करतात. जेव्हा रेखा आमिरसोबत फोटो काढत होत्या तेव्हा त्यांनी आमिर खानला थंब्स अप देत त्याला ऑल दि बेस्टही केलं. चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केले.

फेमस पोटली बॅग साडीप्रमाणेच, रेखा यांच्या पोटली बॅग्ज देखील नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. या फोटोमध्येही त्या सोन्याच्या साडीसोबत मॅचिंग पोटली बॅग्ज घेताना त्या दिसल्या.

रेखा यांचे सौंदर्य आजही बॉलिवूडवर राज्य करत आहे

जेव्हा सुंदर आणि सुंदर लूकचा विचार केला जातो तेव्हा आजही 70 वर्षांच्या रेखा यांचे नाव प्रथम घेतलं जातं. त्यांचे स्टाइल स्टेटमेंट हे नवीन ट्रेंडपेक्षा निश्चितच वेगळी असते. आणि त्यांची हीच स्टाईल आजही लोकांच्या मनावर राज्य करतेय. अगदी बॉलिवूडवर सुद्धा.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.