AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha | ‘या’ व्यक्तीसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात रेखा? अनेकदा फोटो आले समोर

रेखा यांच्या आयुष्यातील 'त्या' व्यक्तीचं महत्त्व, रेखा यांच्या बेडरुममध्ये फक्त खास व्यक्तीलाच एन्ट्री... अभिनेत्रीच्या आयुष्यातील मोठी गोष्ट समोर...

Rekha | 'या' व्यक्तीसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात रेखा? अनेकदा फोटो आले समोर
रेखा
| Updated on: Jul 22, 2023 | 10:19 AM
Share

मुंबई | 22 जुलै 2023 : ‘सिलसिला’, ‘खून भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘खिलाडीओ का खिलाडी’, ‘कोई मिल गया’, ‘दिल है तुम्हारा..’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्री रेखा यांनी महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. प्रोफेशनल आयुष्यात रेखा यशाच्या उच्च शिखरावर चढल्या, पण खासगी आयु्ष्यात मात्र रेखा यांना चढ – उतारांचा सामना करावा लागला. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना रेखा यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतही नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील रेखा तुफान चर्चेत असतात.

अमिताभ आणि रेखा यांचं नातं तुटल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक मुकेश अग्रवाल (Mukesh Aggarwal) यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही… असं सांगण्यात येतं. पतीच्या निधनानंतर रेखा त्यांच्या सेक्रेटरीसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. रेखा यांच्या बायोग्राफीमध्ये देखील याचा उल्लेख करण्यात आला आहे. (rekha affair with farzana)

रेखा यांच्या सेक्रेटरीचं नाव फरजाना आहे. अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्ये फरजाना कायम रेखा यांच्यासोबत असतात. फरजाना एर हेयर ड्रेसर म्हणून रेखा यांच्यासाठी काम करत होत्या. पण दिवसागणिक दोघींमधील नातं अधिक घट्ट होवू लागलं. ओखळ वाढत गेल्यानंतर रेखा यांनी फरजाना यांना स्वतःची सेक्रेटरी म्हणून ठेवून घेतलं.

अशात कोणालाही रेखा यांच्या बेडरुममध्ये जाण्याआधी फरजाना यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते. रेखा आणि फरजाना यांच्या नात्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. रेखा यांच्या कुटुंबातील एका सदस्याने देखील त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं की, त्यांचं नाते पती-पत्नीसारखे आहे. पण रेखा यांनी यावर मौन बाळगलं आहे.

यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखाच्या बायोग्राफीमध्ये हे गोष्ट उघड झाली आहे की, अभिनेत्री गेल्या तीस वर्षांपासून सेक्रेटरी फरजानासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पतीच्या निधनानंतर फरजाना आणि रेखा यांच्यातील नातं बहरलं असं देखील सांगण्यात येतं. (rekha farzana controversial love story)

रेखा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मुकेश अग्रवाल डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगण्यात आलं. अखेर होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. महत्त्वाचं म्हणजे रेखा यांच्या ओढणीनंच गळफास घेवून पतीने जीवन संपवल्याचं देखील सांगण्यात आलं. पतीच्या निधनानंतर रेखा यांना मोठा धक्का बसला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.