रेखा यांची खरी लायकी अखेर…, रेखा यांच्यावर निशाणा साधणारा अभिनेता कोण?

Rekha: रेखा यांना त्यांची लायकी दाखवणारा 'तो' अभिनेता कोण? त्याने का साधला रेखा यांच्यावर निशाणा? ती पोस्ट होतेय सर्वत्र व्हायरल... वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

रेखा यांची खरी लायकी अखेर..., रेखा यांच्यावर निशाणा साधणारा अभिनेता कोण?
फाईल फोटो
| Updated on: Jun 30, 2025 | 12:43 PM

Rekha: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रेखा यांचे अनेक सिनेमे असे आहे जे चाहते त्याच उत्साहाने आज देखील पाहतात. अशात रेखा यांचा ‘उमराव जान’ सिनेमा 44 वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. मुजफ्फर अली दिग्दर्शित सिनेमाची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. तर सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर एका अभिनेत्याने रेखा यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांची चर्चा सुरु आहे.

रेखा यांच्यावर निशाणा साधणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता केआरके आहे. केआरके ट्विट करत म्हणाला, ‘रेखा यांची वागणूक अशी आहे, त्यांना असं वाटतं आजही त्या बॉलिवूडच्या सुपरस्टार आहेत आणि लोकांनी स्वतःची घरं विकून ‘उमराव जान’ पाहिला आहे.’

एवढंच नाही तर केआरके याने दावा केला आहे की, ‘सोमवारी सिनेमाचं नेटकलेक्शन फक्त 3 लाख रुपये समोर आलं आहे. कदाचित आता रेखा यांना लायकी कळाली असले…’ केआरके याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रेखा यांच्याविरोधात पोस्ट न करण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी अभिनेत्याला दिला आहे.

 

 

रेखा यांच्या ‘उमराव जान’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘रेखा यांची सिनेमासाठी पहिली निवड करण्यात आली नव्हती. पण त्यांच्यामुळे सिनेमा एका वेगळ्या नव्या उंचीवर पोहोचवला. सिनेमासाठी पहिली निवड स्मिता पाटील यांची करण्यात होती.’

‘रेखा यांच्या डोळ्यात कथा सांगण्याची शक्ती होती. जे रेखा करु शकतात ते कोणीच करु शकत नाही…’ असं देखील मुजफ्फर अली म्हणाले होते. सिनेमात रेखा यांनी दमदार भूमिका साकारली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

रेखा यांनी 80 – 90 च्या काळीत बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण रेखा खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा प्रचंड सुंदर दिसतात आणि चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. चाहत्यांना देखील रेखा यांचा प्रत्येक लूक प्रचंड आवडतो.