Rekha | ..अन् रेखा यांनी पापाराझीच्या कानाखाली मारली; व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस

एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या मनमोहक सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं. या कार्यक्रमातून बाहेर पडतानाचा रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Rekha | ..अन् रेखा यांनी पापाराझीच्या कानाखाली मारली; व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस
RekhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 9:54 AM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री रेखा या नेहमीच त्यांच्या एव्हरग्रीन सौंदर्यामुळे चर्चेत असतात. त्यांना पाहून कोणी असं म्हणूच शकत नाही की त्या 68 वर्षांच्या आहेत. सौंदर्य आणि स्टाइलच्या बाबतीत रेखा यांच्यासमोर तरुण अभिनेत्रीही फिक्या पडतात. नुकतीच त्यांनी एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी रेखा यांच्या मनमोहक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. या कार्यक्रमात रेखा यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी चाहते फार उत्सुक होते. अशातच एका व्यक्तीने रेखा यांच्या हातून गालावर हलकासा मारसुद्धा खाल्ला. अर्थातच त्यांनी प्रेमाने आणि मस्करीत त्या व्यक्तीला गालावर मारलं. मात्र त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात रणदीप हुडा, मनीष मल्होत्रा, रवीना टंडन, वाणी कपूर, जिया शंकर आणि जरीन खान यांसारख्या कलाकारांनीही हजेरी लावली.

कार्यक्रमाला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित असतानाही सर्वांची नजर मात्र रेखा यांच्यावरच खिळली होती. त्याच या कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. सध्या सोशल मीडियावर रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्याभोवती चाहते आणि पापाराझींचा घोळका पहायला मिळतोय. त्या स्मितहास्य करत आणि हात जोडून फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

यादरम्यान एका चाहत्याने रेखा यांना त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी रोखलं. त्यावेळी रेखा थांबल्या आणि आधी त्याच्या गालावर मारण्याचा इशारा केला. नंतर त्या चाहत्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी फोटोसाठी पोझ दिला आणि तिथून निघताना त्यांनी चाहत्याच्या गालावर हलक्या हाताने मारलं. त्यानंतर त्या तिथून हसत निघून जातात आणि पापाराझींसमोर फोटोसाठी विविध पोझ देतात. रेखा यांची ही गंमत पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं.

रेखा यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तो माणूस किती नशीबवान आहे. त्याला रेखाजींनी स्पर्श केला. आता तो अंघोळसुद्धा करणार नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘आजकालची पिढी रेखाजींना टक्कर देऊच शकत नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. रेखा या 2014 पासून चित्रपटांमध्ये झळकल्या नाहीत. मात्र या वर्षी ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये त्या झळकल्या होत्या.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.