Anant Ambani | आजारपण, राधिकसोबतच नातं याबद्दल अनंत अंबानी प्रथमच झाले व्यक्त, म्हणाले….
Anant Ambani | आयुष्यभराचा जोडीदार म्हणून राधिका मर्चंटची निवड का केली? लग्नाबद्दल काय वाटायच? याबद्दल अनंत अंबानी प्रथमच व्यक्त झालेत. सध्या बॉलिवूड, उद्योग विश्वात अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा आहे. अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे पुत्र आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant pre-wedding | सध्या बॉलिवूड, उद्योग विश्वात अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा आहे. अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे पुत्र आहेत. अनंत अंबानी यांनी भावी पत्नी राधिक मर्चंटच खूप कौतूक केलय. आरोग्य समस्यांशी झुंज सुरु असताना राधिकासारख कुणीच पाठिशी उभं राहिलं नाही, असं अनंत यांनी सांगितलं. ती माझ्या स्वप्नातली मुलगी आहे, असं अनंत अंबानी म्हणाले. ते इंडिया टुडेशी बोलत होते. गुजरात जामनगर येथे अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे.
अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार या प्री-वेडिंग कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत. यात पॉप आयकॉन रिहाना, अर्जित सिंह आणि दिलजीत दोसानज सारखे कलाकार आहेत. जामनगरच्या रिलायन्स ग्रीन कॉम्पलेक्समध्ये 1 मार्चपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग सारखे उद्योगपती या विवाह सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
‘मी लग्न करणार नाही, असं मला वाटायच’
“मी भाग्यवान आहे, राधिका माझ्या आयुष्यात आहे. ती म्हणजे माझ स्वप्न आहे. लहानपणापासून मी प्राण्यांची काळजी घ्यायचो, त्यामुळे मी लग्न करणार नाही, असं मला वाटायच. पण मी राधिकाला भेटलो, त्यावेळी मला तिच्यामध्ये माझ्यासारखेच गुण दिसले. ती देखील ममतेने प्राण्याची देखभाल करायची, त्यांची काळजी घ्यायची” असं अनंत अंबानी म्हणाले.
‘लठ्ठपणासह आरोग्याच्या अनेक समस्या’
बालपणापासून अनंत अंबानी यांना लठ्ठपणासह आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. अनंत यांना दम्याचा त्रास असल्याने वजन कमी करण्यात अनेक अडचणी होत्या, असं नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. आरोग्याच्या तक्रारी असताना राधिका कशी पाठिशी उभा राहिली? त्या बद्दलही अनंत व्यक्त झाले. “माझ्या आरोग्याच्या समस्या सुरु होत्या. कठीण काळ होता. त्यावेळी राधिका भक्कमपणे माझ्या पाठिशी उभी राहिली. मी आजारी आहे, असं मला पालकांनी सुद्धा कधी जाणवू दिलं नाही. डॉक्टरने काही गोष्टी सोडून दिलेल्या, पण त्यांनी आशा सोडली नव्हती. राधिकाने मला बळ दिलं” असं अनंत अंबानी म्हणाले.