AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री आयसीयूमध्ये, पाचव्या केमोनंतर प्रकृती गंभीर; 15व्या वर्षीच जाणवली होती गाठ

'बिग बॉस मल्याळम 7'ची स्पर्धक रेणू सुधीच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. रेणूची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

'बिग  बॉस' फेम अभिनेत्री आयसीयूमध्ये, पाचव्या केमोनंतर प्रकृती गंभीर; 15व्या वर्षीच जाणवली होती गाठ
Renu SudhiImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 24, 2026 | 2:44 PM
Share

‘बिग बॉस मल्याळम 7’मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर रेणू सुधीची प्रकृती सध्या गंभीर आहे. कॅन्सरशी लढा देत असलेल्या रेणूवर उपचार सुरू असून पाचव्या केमोथेरपीनंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. सध्या तिला केरळमधील कोट्टायम मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रेणूची मैत्रीण आणि ‘बिग बॉस मल्याळम 7’मधील सहस्पर्धक सारिका केबी हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. सारिकाने दिलेल्या माहितीनुसार, रेणूची प्लेटलेट्सची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.

याआधीच्या केमोथेरपीनंतर काही दिवस आराम करून रेणू पुन्हा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत होती. मात्र पाचव्या केमोनंतर परिस्थिती वेगळी झाली. दहा दिवस उलटल्यानंतरही तिला उठता येत नसल्याचं सारिकाने सांगितलं. रेणूला सध्या अन्न खाण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे तिच्यासाठी PICC लाइनचा वापर करण्यात आल्याची माहिती सारिकाने दिली. तिच्या प्रकृतीमुळे पुढील केमोथेरपी देणं सध्या धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचंही सारिकाने स्पष्ट केलं. त्यामुळे कुटुंबीय आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे.

15व्या वर्षी जाणवली होती शरीरात गाठ

रेणूने यावर्षी जूनमध्ये सोशल मीडियावर आपल्या कॅन्सरच्या आजाराबाबत खुलासा केला होता. तिने सांगितलं होतं की, वयाच्या 15व्या वर्षी तिला शरीरात एक गाठ जाणवली होती. मात्र त्यावेळी त्याचं गांभीर्य लक्षात आलं नव्हतं. पुढे वैद्यकीय तपासण्यांनंतर ही गाठ कॅन्सरशी संबंधित असल्याचं समोर आलं. रेणूने तिचा उपचाराचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर करत कॅन्सरशी लढणाऱ्या इतरांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता.

पतीच्या निधनानंतरही सुरू ठेवला संघर्ष

रेणू सुधी ही दिवंगत मल्याळम कॉमेडियन आणि मिमिक्री आर्टिस्ट कोल्लम सुधी यांची पत्नी आहे. जून 2023 मध्ये झालेल्या रस्ते अपघातात कोल्लम सुधी यांचं निधन झालं. त्यानंतर रेणूने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि कंटेंट क्रिएटर म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर तिला ‘बिग बॉस मल्याळम 7’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मात्र वैयक्तिक आणि भावनिक कारणांमुळे तिने शोमधून माघार घेतली होती.

रेणूच्या सध्याच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. सारिकानेही चाहत्यांना रेणूसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Follow Us
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा