Rhea Chakraborty | ‘तुमच्या बेडरूममध्ये कोणी कॅमेरा लावला आणि…’, असं का म्हणाली रिया चक्रवर्ती?

Rhea Chakraborty | खासगी आयुष्यावर चव्हाट्यावर आल्यानंतर कशी होती रिया चक्रवर्ती हिची प्रतिक्रिया? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिया चक्रवर्ती हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा... आता अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Rhea Chakraborty | तुमच्या बेडरूममध्ये कोणी कॅमेरा लावला आणि..., असं का म्हणाली रिया चक्रवर्ती?
| Updated on: Oct 06, 2023 | 9:33 AM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे सर्वत्र पुन्हा सुशांत याच्या निधनाची चर्चा रंगली आहे. सुशांत यांच्या निधनानंतर रिया हिला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. एवढंच नाही चौकशी दरम्यान रिया हिनचे व्हॅस्टऍप चॅट देखील समोर आले होते. ज्यामुळे अभिनेत्रीच्या अनेक खासगी गोष्टी समोर आल्या होत्या. आता झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिया चक्रवर्ती हिची चर्चा रंगली आहे.

खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

मुलाखतीत अभिनेत्री व्हॅस्टऍप चॅट आणि खासगी गोष्टींबद्दल वक्तव्य केलं. चौकशी दरम्यान आलेल्या चॅटमध्ये सुशांत, निर्माते महेश भट्ट आणि कुटुंबियांसोबत रिया हिने केलेले चॅट समोर आले होते. यावर आभिनेत्री म्हणाली, ‘खासगी आयुष्य हे गुपितच राहायला हवं. कोणाला चांगलं वाटेल की कोणी आपल्या खासगी आयुष्यात मध्यस्ती करत असेल…’

‘प्रत्येकाला खासगी आयुष्य जगण्याचा आधिकार आहे. फक्त तो दहशतवादी नसायला हवा. आपल्याला आपल्या खासगी आयुष्याबद्दल कोणाला सांगायचं कोणाला नाही सांगायचं ही आपली बाजू आहे. तुम्हाला कसं वाटेल तुमच्या बेडरुमध्ये कॅमेरा लावला आहे आणि तुम्ही तुमच्या पत्नीसोबत आहात..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं होतं, जे मला बिलकूल आवडलं नव्हतं. मी कोणालाही मेसेज करेल, ते माझं खासगी आयुष्य आहे…’ आयुष्यात आलेल्या वाईट दिवसांना आठवत रिया म्हणाली, ‘मला संधी मिळाली असती तर, पुरुषप्रधान विचारांना २०२० पूर्वी संपवलं असतं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिया हिची चर्चा रंगली आहे.

रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील रिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.