AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर रिया चक्रवर्ती हिने सांगितला तुरुंगात राहण्याचा ‘तो’ अनुभव, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. रिया चक्रवर्ती हिने नुकताच मोठा खुलासा केला. सुशांतच्या निधनानंतर काही दिवस तुरुंगात राहण्याची वेळ रिया चक्रवर्ती हिच्यावर आली.

अखेर रिया चक्रवर्ती हिने सांगितला तुरुंगात राहण्याचा 'तो' अनुभव, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
| Updated on: Oct 27, 2023 | 8:19 AM
Share

मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर एक नाव प्रचंड चर्चेत आले ते म्हणजे रिया चक्रवर्ती हिचे. रिया चक्रवर्ती हिने नुकताच तिचा तुरुंगातील अनुभव हा शेअर केलाय. रिया चक्रवर्ती हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना रिया चक्रवर्ती दिसली. तिने सांगितले की, तुरुंगातील आयुष्य नेमके कसे आहे. तिथे उपस्थित असलेल्या महिला या कशाप्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी होतात.

सुशांत सिंह राजपूत याच्या निशाणानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप हे केले गेले. इतकेच नाही तर थेट काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ ही रिया चक्रवर्ती हिच्यावर आली. सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या निशाण्यावर रिया चक्रवर्ती आली. सतत सोशल मीडियावर रिया चक्रवर्ती हिला खडेबोल सुनावले जातात.

रिया चक्रवर्ती म्हणाली की, मी अंडर ट्रायल तुरुंगात होते. तिथे माझ्यासोबत अनेक महिला देखील होत्या. तुरुंगात टाकले जाते म्हणजे तुम्हाला समाजापासून वेगळे ठेवण्यात येते. समाजामध्ये तुम्हाला अयोग्य मानले जाते. तिथे जाणे सर्वांसाठी निराशाजनक आहे. मात्र, तिथे गेल्यावरच कळते की, आयुष्यातील आनंद कशाला म्हणतात.

गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्ती ही सतत मुलाखती देताना दिसतंय. या मुलाखतींमध्ये रिया चक्रवर्ती ही मोठे खुलासे करताना दिसत आहे. इतकेच नाही तर रिया चक्रवर्ती ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्ती हिला थेट व्यावसायिक निखिल कामथ यांच्यासोबत स्पाॅट केले गेले. निखिल कामथ आणि रिया चक्रवर्ती हे एकाच गाडीमध्ये बसून निघून गेले.

पापाराझी यांना पाहून रिया चक्रवर्ती ही चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली. तेंव्हापासूनच एक चर्चा आहे की, रिया चक्रवर्ती ही निखिल कामथ याचा डेट करतंय. निखिल कामथ हा तब्बल 23 हजार कोटी संपत्तीचा मालक आहे. रियाचे आणि निखिल कामथ यांचे अनेक फोटोही व्हायरल होताना दिसले. मात्र, अजूनही रिया चक्रवर्ती हिच्याकडून निखिल कामथ याच्यासोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य करण्यात नाही आले.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!