Richa-Ali Wedding: रिचा-अलीच्या लग्नात फोनची बंदी नाही, पण ‘ही’ असेल महत्त्वाची अट

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Sep 24, 2022 | 1:54 PM

सेलिब्रिटी लग्नसोहळ्याची गोष्टच निराळी; रिचा-अलीने पाहुण्यांना घातली 'ही' अट

Richa-Ali Wedding: रिचा-अलीच्या लग्नात फोनची बंदी नाही, पण 'ही' असेल महत्त्वाची अट
Richa Chadha and Ali Fazal
Image Credit source: Instagram

मुंबई: ‘गुड्डू भैय्या’ म्हणजेच अभिनेता अली फजल (Ali Fazal) आणि अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. रिचा-अलीचं लग्न कुठे पार पडणार, लग्नातील कपड्यांसाठी त्यांनी कोणत्या फॅशन डिझायनरला पसंती दिली, बॉलिवूडमधल्या कोणत्या कलाकारांना आमंत्रिक केलं गेलंय, हे सर्व जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता लग्नाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे.

30 सप्टेंबरपासून रिचा आणि अलीच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. हे दोघं 6 ऑक्टोबर रोजी मुंबईत लग्नगाठ बांधणार आहेत. हल्ली सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यात ‘नो मोबाइल फोन पॉलिसी’ खूपच प्रचलित झाली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नये यासाठी हा नियम लावला जातो. मात्र रिचा-अलीने पाहुण्यांना यात मुभा दिली आहे.

या दोघांच्या लग्नसोहळ्यात पाहुणे मोबाईल फोन वापरू शकतील. फक्त त्यांना एका अटीचं पालन करावं लागेल. हे पाहुणे हातात मोबाइल फोन असला तरी रिचा-अलीच्या लग्नाचे फोटो क्लिक करू शकणार नाहीत. हीच अट या दोघांकडून पाहुण्यांना घालण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना पूर्णपणे मोबाईल फोनच्या वापरावर बंदी होती. मात्र पाहुण्यांना लग्नसोहळ्याचा मुक्तपणे आनंद घेता यावा, यासाठी रिचा-अलीने फक्त फोटो क्लिक न करण्याची अट ठेवली आहे.

फुकरे आणि फुकरे रिटर्न्स या चित्रपटांमध्ये रिचा-अलीने एकत्र काम केलं होतं. आपल्या लव्ह-लाईफविषयी ही जोडी नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. 2015 पासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI