AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिंकू राजगुरु कोल्हापूरची सून होणार? भाजप खासदाराच्या मुलासोबतचा फोटो चर्चेत

रिंकू राजगुरुचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरातील आहे. एका बड्या नेत्याच्या मुलासोबतचा हा फोटो असून त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. दोघांचा एकत्रित फोटो पाहून रिंकू आता कोल्हापूरची सून होणार का? असे प्रश्नही अनेकांनी विचारले आहेत.

रिंकू राजगुरु कोल्हापूरची सून होणार? भाजप खासदाराच्या मुलासोबतचा फोटो चर्चेत
| Updated on: Feb 11, 2025 | 12:47 PM
Share

सैराटमुळे सर्वांच्याच मनावर राज्य करणार्‍या रिंकू राजगुरुला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. रिंकू राजगुरुने सैराटनंतरही अनेक चित्रपट केले. त्या सर्व चित्रपटांमधून देखील आपल्या अभिनयाची वेगळी झलक दाखवली. अनेकदा रिंकूला मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं आहे. तेंव्हा तिला तिच्या खर्‍या आयुष्यात कोणी परश्या आहे का? असं अनेकदा विचारण्यात आलं होतं.अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे.

रिंकू राजगुरुच्या फोटोची चर्चा

रिंकू राजगुरुच्या सोशल मीडिया पोस्टची, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते.अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे. रिंकू राजगुरुचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या फोटोमुळे रिंकू कोल्हापूरची सून होणार का?

अशा चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. या फोटोमध्ये रिंकू भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्याचे दिसत आहे.

भाजप खासदारच्या मुलासोबत फोटो व्हायरल

स्वतः कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवरुन शेअर केला आहे. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले, असा कॅप्शन दिलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही नेटकऱ्यांना रिंकूच्या चेहऱ्यावरचे लाजणे वेगळंच वाटत असल्याच म्हंटल जात आहे.तर काही नेटकर्‍यांनी ‘जोडा छान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर एका नेटकऱ्याने लग्नाचं मनावर घेतलेलं दिसतंय? असं म्हणत या व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

कृष्णराज महाडिक आणि रिंकूचा फोटोची सोशल मीडियावर चर्चांना

कृष्णराज महाडिक आणि रिंकूचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या फोटोच रहस्य जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे.दरम्यान रिंकूने या फोटोवर येणार्‍या कमेंट्सवर अद्यापतरी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ती आता यावर काय बोलणार याची सर्व चाहते वाट पाहतायत. कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरचे नेते, भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते युट्यूबर असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.