AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant: उर्वशीने पोस्ट केले असे फोटो, जे पाहून ऋषभ पंतचे चाहते म्हणाले, “सुहाग खतरे में है और इनको..”

ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशीचे नवीन फोटो व्हायरल; क्रिकेटरच्या चाहत्यांचे कमेंट्स एकदा वाचाच!

Rishabh Pant: उर्वशीने पोस्ट केले असे फोटो, जे पाहून ऋषभ पंतचे चाहते म्हणाले, सुहाग खतरे में है और इनको..
Rishabh Pant and Urvashi RautelaImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2023 | 11:11 AM
Share

मुंबई: कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या क्रिकेटर ऋषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं समजतंय. त्याला पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवायचं की नाही याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. देहरादूनमधल्या मॅक्स रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऋषभच्या अपघातानंतरच्या तिच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर ती मुंबई एअरपोर्टवर दिसली असता, पंतला भेटण्यासाठी जात असल्याचा अंदाज चाहत्यांनी वर्तवला. आता उर्वशी तिच्या नव्या फोटोंमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारी उर्वशी नेहमीच तिच्या फोटोशूटचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिचे काही असे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यानंतर ऋषभच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये उर्वशीने काही भरजरी दागिने परिधान केले आहेत.

उर्वशीने तिच्या गळ्यात, कानात आणि हातात जे दागिने परिधान केले आहेत, ते सर्व मगरीच्या डिझाइनचे आहेत. ऋषभच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव केला आहे. ‘तिकडे भाऊ रुग्णालयात दाखल आहे आणि तुझा इथे फॅशन शो सुरू आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘मगरमच्छ के आंसू’ अशा शब्दांत दुसऱ्याने टीका केली.

‘बघतोय ना विनोद, ज्याच्यामागे हात धुवून लागली होती, आज त्याची काही पर्वा नाही.. घोर कलयुग’ असंही एकाने म्हटलंय. इतकंच नव्हे तर ‘सुहाग खतरे में है इनको ये सूझ रहा,’ अशीही कमेंट नेटकऱ्याने केली आहे.

ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीची एक पोस्ट व्हायरल झाली होती. स्वत:चा एक फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘प्रार्थना करतेय’. या कॅप्शनवरून उर्वशी ही ऋषभसाठी प्रार्थना करत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता.

उर्वशीने एका मुलाखतीत ‘आरपी’ असा उल्लेख केल्यापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. उर्वशीचा आरपी हा ऋषभ पंतच आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दोघांनी एकमेकांना सुनावलंही होतं.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.