AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसलेंची एक इच्छा राहिली अपूर्ण… रितेश देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, कुटुंबाचा फोन आला…

Asha Bhosle : आशा भोसले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालेले आहे. आता अभिनेता रितेश देशमुखने आशा भोसले यांच्याशी संबंधित एक खास आठवण शेअर केली आहे.

आशा भोसलेंची एक इच्छा राहिली अपूर्ण... रितेश देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, कुटुंबाचा फोन आला...
Asha Bhosle and Ritesh DeshmukhImage Credit source: Google
| Updated on: May 02, 2026 | 9:01 PM
Share

दिग्गज गायिका आशा भोसले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालेले आहे. सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडलचा आगामी भाग आशा भोसले यांना समर्पित असणार आहे. या खास प्रसंगी बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता रितेश देशमुखने कार्यक्रमाला हजेरी लावून आशा ताईंशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणी सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली. रितेश यांनी सांगितले की आशा भोसले त्यांच्यासाठी फक्त महान गायिका नव्हत्या, तर त्यांचं नातं आई-मुलासारखं होतं. या वेळी त्यांनी आतापर्यंत न ऐकलेले किस्से शेअर केले आहेत.

रितेश देशमुख काय म्हणाला?

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आशा भोसले यांच्यासोबतच्या आठवणीचा उल्लेख करताना रितेश म्हणाला की, ‘त्या जेव्हा त्यांना भेटायच्या तेव्हा त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवायच्या. जेव्हा त्या मला पहिल्यांदा भेटल्या, तेव्हा त्यांनी अगदी आई आपल्या मुलावर जसं प्रेमाने हात फिरवते तसं माझ्या डोक्यावर हात फिरवला. त्या दिवसापासून मी त्यांना आशा आई म्हणायला सुरुवात केली आणि आजही मी त्यांना त्याच नावाने हाक मारतो.’

सांगितला खास किस्सा

आशाताईंसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना रितेश म्हणाला की, ‘एकदा गप्पांच्या ओघात आशा ताईंनी मला विचारलं होतं, तुला काय आवडतं? तू काय खातोस? त्यानंतर त्यांनी रितेश यांना प्रेमाने घरी बोलावलं. मी त्यांच्या घरी गेलो, तिथे एकत्र जेवण केलं आणि खूप गप्पा मारल्या. ही भेट माझ्या मनात कायमची कोरली गेली आहे.’

आशाताईंची ती इच्छा अपूर्ण राहिली

रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाबाबत बोलताना म्हटले की,’आशा ताईंनी फोन करून म्हटलं होतं, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे, तू एक चांगला चित्रपट बनव. तो रिलीज झाल्यावर मी नक्की पाहीन. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबाकडून फोन आला होता की आशा ताईंना हा चित्रपट पाहण्याची खूप इच्छा होती. मात्र दुर्दैवाने आशा आई आता हा चित्रपट पाहू शकणार नाहीत.’

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा