Riteish Deshmukh : माझा वनवास काही संपला नाही…, ‘तो’ खास फोटो, रितेशची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Riteish Deshmukh Social Media Post : अभिनेता रितेश देशमुख याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पोस्ट पाहिल्यानंतर आणि कॅप्शन वाचल्यानंतर सर्वाच्याच डोळ्यात पाणी आलं... सध्या सर्वत्र रितेशच्या पोस्टची चर्चा...

Riteish Deshmukh : माझा वनवास काही संपला नाही..., तो खास फोटो, रितेशची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
Riteish Deshmukh
| Updated on: Aug 14, 2026 | 11:39 AM

Riteish Deshmukh Social Media Post : अभिनेता रितेश देशमुख तिच्या सिनेमांमुळे कमी पण, खासगी आयुष्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आलं आहे. रितेश याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने खास कॅप्शन देखील लिहिल आहे. अता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल अभिनेत्याने वडिलांसोबत फोटो का पोस्ट केला आहे. तर आज विलासराव देशमुख यांची 14 वी पु्ण्यतिथी आहे… यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शन वाचल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी देखील आलं आहे.

वडील विलासराव देशमुख यांच्यासोबत फोटो पोस्ट करत रितेश म्हणाला, ‘तुम्हाला जाऊन 14 वर्ष झाली आहेत… माझा वनवास काही संपलेला नाही…’, असं कॅप्शन रितेश याने पोस्टसाठी लिहिल आहे. ज्यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत. रितेश याच्या फोटोवर अभिनेत्री जिनिलिया हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. कमेंट करत अभिनेत्रीने तुडलेल्या हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील पोस्टवर कमेंट करत आदरांजली वाहिली आहे.

 

नेटकऱ्यांनी देखील पोस्टवर कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘लातूर म्हणजे साहेब अन साहेब म्हंजी लातूर…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुळजापूर च्या विकासामध्ये योगदान अमूल्य आहे… विकास प्राधिकरण साहेबांनी सुरु केले.’, तिसरा नेटकर म्हणाला, ‘माणूस जातो, पण त्याचं कर्तृत्व कधीच मरत नाही… विलासराव साहेब’, तर एका नेटकऱ्यांने रितेश याचं देखील कौतुक केलं आहे, म्हणाला, ‘सुपुत्र असावा तर तुझ्या सरखा…वडीलांवर प्रेम करावं तर असं….’

सांगायचं झालं तर, रितेश कायम वडिलांच्या जयंती आणि पुण्यतिथीला पोस्ट करत असतो. जिनिलिया देखील पोस्ट करते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं निधन 14 ऑगस्ट रोजी झालं. विलासराव देशमुख यांनी वयाच्या 67 व्या अखेरचा श्वास घेतला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us