AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शेट्टी फायरिंग केस, चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासा, गँगस्टरचा गेम, व्हिडीओ कॉल आणि…

Rohit Shetty Firing Case : दिग्दर्शक रोहित शेट्टी फायरिंग केस प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे... आता तर चार्जशीटमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे... हल्ला झाला तेव्हा काय करत होता अनमोल बिश्नोई? मोठी माहिती समोर....

रोहित शेट्टी फायरिंग केस, चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासा, गँगस्टरचा गेम, व्हिडीओ कॉल आणि...
दिग्दर्शक रोहित शेट्टी
| Updated on: May 22, 2026 | 8:15 AM
Share

Rohit Shetty Firing Case : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शत रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या या प्रकरणी अधिक चौकशू सुरु असून, नुकताच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. जेव्हा रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा अनमोल बिश्नोई याचं संपूर्ण लक्ष घडत असलेल्या घटनेकडे होतं. रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

गँगस्टर अनमोल बिश्नोईने रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या संपूर्ण कारवाईवर व्हिडिओ कॉलद्वारे लक्ष ठेवलं असल्याची माहिती समोर येत आहे. जोपर्यंत हल्ला पूर्ण होत नाही, तोपर्यंत तो गोळीबार करणाऱ्यांच्या म्हणजेच शूटर्सच्या संपर्कात होता.

संबंधित माहिती गेल्या महिन्यात विशेष ‘मकोका’ (MCOCA) न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहिती प्रमाणे हा गोळीबार एका पूर्व-नियोजित मोहिमेचा भाग होता. ज्याचा उद्देश दहशत निर्माण करणे आणि टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा होता.

विशेष ‘मकोका’ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 1 हजार 624 पानांच्या दोषारोपपत्रात असं म्हटलं आहे की, या घटनेदरम्यान बिश्नोई हा मुख्य गोळीबाराला शूटरला कथितरित्या सूचना देत होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी मुख्य शूटरला प्रोत्साहित करत होता.

दोषारोपपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, मुख्य आरोपी प्रदीप कुमार याने प्रत्यक्ष गोळीबार होण्याच्या सुमारे 10 दिवस आधीच, शेट्टी यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्याचा एक प्रयत्न कथितरित्या केला होता. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतली जबाबदारी…

गोळीबार झाल्यानंतर 1 फेब्रुवारी 2026 मध्ये आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जबाबदारी स्वीकारली. पोस्टमध्ये लिहिलं, ‘आज रोहित शेट्टी याच्या घरावर जो गोळीबार झाला, त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. पुढे सर्व बॉलिवूडकरांना चेतावनी आहे की, वेळ आहे तोपर्यंत सुधरा नाही तर, बाबा सिद्दीकी सारखी अवस्था होईल…’, याआधी देखील बिश्नोई टोळीने अनेक सेलिब्रिटींनी धमकी दिली आहे, तर अनेकांच्या घरावर गोळीबार केला आहे.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.