पहिल्या बायकोला 6 महिन्यांच्या लेकीसोबत सोडून रोनित रॉयने थाटला दुसरा संसार, घटस्फोटानंतर ती कसं जगतेय आयुष्य?

Ronit Roy First Marriage: पहिली बायको आणि 6 महिन्यांच्या लेकीला सोडून रोनित रॉयने थाटला दुसरा संसार, कोण आहे अभिनेत्याची पहिली बोयको आणि घटस्फोटानंतर कसं जगतेय आयुष्य?

पहिल्या बायकोला 6 महिन्यांच्या लेकीसोबत सोडून रोनित रॉयने थाटला दुसरा संसार, घटस्फोटानंतर ती कसं जगतेय आयुष्य?
Ronit Roy
| Updated on: Apr 03, 2026 | 3:57 PM

Ronit Roy First Marriage: रोनित रॉय (Ronit Roy) याला आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. ‘कसोटी जिंदगी की’, ‘क्राईम पेट्रोल’ यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्याने अनेक उतार – चढाव पाहिलेले आहेत. रोनित फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. अभिनेत्याला अनेकदा पत्नी आणि मुलांसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. पण ते रोनित याचं दुसरं कुटुंब आहे. मुलगी फक्त 6 महिन्यांची असताना अभिनेत्याने पहिल्या बायकोची साथ सोडली आणि दुसरा संसार थाटला. आज अभिनेता दुसऱ्य़ा कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

कोण आहे रोनित रॉय याची पहिली पत्नी?

रोनित रॉय याचं पहिलं लग्न झोआना मुमताज खान हिच्यासोबतट झालं. दोघांना एक मुलगी देखील आहे. झुआना दुसरी तिसरी कोणी नाही तर, सुपरस्टार दिलीप कुमार यांची भाची आहे. 90 च्या दशकात दोघांनी लग्न केलं. तेव्हा रोनित इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता… आज रोनित याला कोणत्या ओळखीची गरज नाही. पण तेव्हा अभिनेत्याने करियरमध्ये फार मोठा खस्ता खाल्लाय आहे… ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) आणि फिल्म ‘उड़ान’ (Udaan) सिनेमानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली…

रोनित याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, रोनित आणि झोआना यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांना त्यांचं नातं टिकवता आलं नाही.. लेक 6 महिन्यांचीचच असताना, झोआना आणि रोनित यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या विभक्त होण्याचं कारण, वाढता दुरावा आणि खासगी आयुष्यात येणाऱ्या अडचणी होत्या.

पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याने दुसरा संसार थाटला. 2003 मध्ये रोनित याने अभिनेत्री आणि मॉडेल नीलम सिंग हिच्यासोबत लग्न केलं. रोनित आणि नीलम यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. दुसऱ्या कुटुंबासोबत अभिनेता आज आनंदी आयुष्य जगत आहे. तर अभिनेत्याची पहिली पत्नी मुलगी ओना हिच्यासोबत राहत आहे.

Follow Us