Roopa Ganguly : पडद्यावर द्रौपदीचं वस्त्रहरण, खऱ्या आयुष्यातही रूपा गांगुलींवर झालेला हल्ला; अभिनेत्रीनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
Roopa Ganguly : अभिनेत्री रूपा गांगुली यांनी एका मुलाखतीत 'महाभारत' मालिकेतील वस्त्रहरणच्या सीनचा अनुभव सांगितला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रूपा गांगुली यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी साकारलेली द्रौपदीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या भूमिकेमुळे रूपा गांगुली यांना देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली. द्रौपदीच्या व्यक्तिरेखेला त्यांनी आपल्या अभिनयातून अक्षरशः जिवंत केलं.
‘चीरहरण’चा सीन करताना रूपा गांगुली खरोखरच जमिनीवर पडल्या होत्या. त्यांना फरफटत नेताना दुःशासनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यालाही चांगलाच घाम फुटला होता. याबद्दल रूपा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शूटिंगदरम्यान त्या केवळ अभिनय करत नव्हत्या, तर प्रसंग अधिक वास्तववादी वाटावा यासाठी त्यांनी पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार केला. त्यांना ओढताना दुःशासनाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यालाही खूप त्रास झाला. फरफटत नेत असताना त्या खरोखरच जमिनीवर पडल्या होत्या. हा अपघात नव्हता किंवा ठरवून केलेली कृती नव्हती, तर चित्रीकरणादरम्यान प्रत्यक्षात घडलेली घटना होती.
अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
अनेकदा चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांना खऱ्या आयुष्यात अशा घटनांना सामोरं जावं लागतं, ज्या लोक फक्त पडद्यावर पाहतात. अशीच एक घटना रूपा गांगुली यांच्यासोबत घडली, जी त्यांनी स्वतः सांगितली आहे. ‘महाभारत’मधील द्रौपदीच्या ‘चीरहरण‘चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना, त्यांनी 2016 मधील या घटनेचा उल्लेख केला.
अभिनेत्रीनं सांगितलं की,जवळपास 17-18 लोकांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी अभिनेत्रीला गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली. या घटनेनंतर तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘गेल्या काही दिवसांपासून मला 22 मे 2016 रोजीची डायमंड हार्बर घटना आठवत आहे. पोलिसांसोबत 17 ते 18 लोक आले होते. त्यांनी मला गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली. त्यांनी गाडीचंही नुकसान केलं. या घटनेत मला दोनदा मेंदूत रक्तस्राव झाला.’
अभिनेत्रीनं एकदा महाभारतातील वस्त्रहरणाच्या दृश्याबद्दलही सांगितलं होतं. रूपा यांनी खुलासा केला की, शूटिंगदरम्यान त्या खरंच पडल्या होत्या, ज्यामुळे दुःशासनाला घाम फुटला होता. आज तकशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘मला कपडे काढण्याचा तो सीन आठवतो. मला ओढत असताना मी खरंच पडले होते. मी दुःशासनला इतका विरोध केला, मला ओढताना मी त्याला इतका त्रास दिला की, त्याला खरंच खूप वेदना झाल्या. त्याला खूप घाम येत होता आणि फरशीवर चालत जाताना जे पडलं ते फक्त अभिनय नव्हता; मी खरंच पडले होते.’
दरम्यान, रूपा गांगुली यांच्यासाठी द्रौपदीची भूमिका ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची भूमिका ठरली.
