AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच! भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. एका तरुणावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच! भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 27, 2026 | 1:57 PM
Share

पुणे जिल्ह्यात कोयता गँगने धुडगूस घातला आहे. पुण्यातील सत्र न्यायालयाच्या आवारात एका टोळक्याने कोयत्याने वार करत मंदार किवळे याचे हात छाटल्याचा भयंकर प्रकार घडला. या टोळक्याने आधी गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने हल्ला केला. कोर्टाच्या आवारातील प्रकारानंतर शिरूरमध्ये एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगावमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी 22 वर्षीय रितेश विनोद राठोड व त्याच्या मित्रांना लक्ष्य केले. या प्रकरणात आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

आरोपींनी कोयते घेऊन दोन दुचाकीवरून तक्रारदार व त्याच्या मित्रांचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले. तक्रारदार आणि त्याच्या मित्रांनी वार चुकवल्याने दोघे बचावले. या घटनेमुळे कोरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. भरदिवसा कोयते घेऊन हल्ला करण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणाचा दोन आरोपीना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

पुण्यातील घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘पुण्यातील घटना दुर्दैवी होती. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत या गुन्ह्यासंदर्भात आणि इतर गोष्टी संदर्भात माहिती घेतली आणि आदेश दिलेत.  या प्रकरणात 6 आरोपी पकडलेले आहेत. बाकीच्या 3 आरोपींचा शोध चालू असून फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्या गोष्टी करण्याचे आदेश दिलेत’. दरम्यान, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसाढवळ्या घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता या प्रकरणात पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून काय कारवाई केली जाते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?