RRR New Poster | ‘आरआरआर’चे नवे पोस्टर प्रदर्शित, रामचरण-ज्युनिअर एनटीआरला एकत्र पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Apr 13, 2021 | 3:20 PM

आरआरआर (RRR) चित्रपटाचे चाहते एस एस राजामौलीच्या दिग्दर्शित या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

RRR New Poster | ‘आरआरआर’चे नवे पोस्टर प्रदर्शित, रामचरण-ज्युनिअर एनटीआरला एकत्र पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला!
आरआर आर
Follow us

मुंबई : आरआरआर (RRR) चित्रपटाचे चाहते एस एस राजामौलीच्या दिग्दर्शित या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. नव विक्रम संवतच्या निमित्ताने या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर एकत्र दिसले आहेत. जमावाने या दोघांनाही उचलून घेतले आहे, असे या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे (RRR New Poster launch junior NTR and Ram charan look).

राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे. राम चरण यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले की ‘मला आशा आहे की आपणा सर्वांचे नवीन वर्ष आनंदमय होईल.’ हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. पोस्टरमध्ये दोघांनी पांढर्‍या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे आणि डोक्यावर पिवळा पट्टा बांधला आहे.

पाहा पोस्टर

View this post on Instagram

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

आलिया भट्टचा ‘सीता’ लूकही चर्चेत

नुकतीच अभिनेत्री आलिया भट्टच्या वाढदिवशी RRR चित्रपटातील सीताच्या भूमिकेतील तिचा लूक रिलीज करण्यात आला होता. पोस्टरमध्ये आलिया हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली दिसली होती. सोशल मीडियावर आलियाच्या या लूकचे जोरदार कौतुक झाले.

आलिया भटची तेलगू चित्रपटात एन्ट्री

अजय देवगन सोबत आलिया भटनेही या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटात एन्ट्री केलीय. काही दिवसांपूर्वी RRR चित्रपटाच्या निर्मात्यांनी आलिया भटचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केलं होतं. आलिया भटचा फर्स्ट लूकही तिच्या वाढदिवसाला म्हणजे 15 मार्च रोजी रिलीज केला होता. आलिया या चित्रपटात सीताची भूमिका बजावतेय (RRR New Poster launch junior NTR and Ram charan look).

RRR मधील स्टारकास्ट

आलिया भट RRRमध्ये राम चरणच्या आपोझिट भूमिका साकारत आहे. तर, ज्यूनिअर एनटीआर ओलिवियासह रोमांस करताना दिसत आहेत. आलिया भट, अजय देवगण, राम चरण, आणि ज्यूनिअर एनटीआरसह या चित्रपटात समुथिरकानी, ओलिविया मॉरिस, एलिसर डूडी आणि रे स्टीवनसनही प्रमुख भूमिकेत आहेत.

दक्षिणेमध्ये ‘इतक्या’ कोटींना विकले गेले हक्क

निजाम – 75 कोटी रुपये

आंध्र प्रदेश – 165 कोटी रुपये

तामिळनाडू – 48 कोटी रुपये

मल्याळम – 15 कोटी रुपये

कर्नाटक – 45 कोटी रुपये

चांगला गल्ला जमवणार!

खास गोष्ट म्हणजे ‘बाहुबली 2’च्या रिलीजपूर्वी या आकड्याला मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण-भाषिक राज्यांमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले होते. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रिलीज झाल्यानंतर ‘आरआरआर’ चांगलाच गल्ला जमवणार आहे. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.

(RRR New Poster launch junior NTR and Ram charan look)

हेही वाचा :

Expensive Car | अर्जुन कपूरने खरेदी केली Land Rover defender, जाणून घ्या या गाडीची किंमत…

Radhe Shyam | पाडव्याच्या मुहूर्तावर ‘राधे श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित, ‘डार्लिंग’ प्रभासचा रेट्रो लूक पाहून चाहते घायाळ!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI