‘महाराष्ट्र एफस्टीन फाईल’ विरोधात रूपाली चाकणकर यांची नोटीस, 25 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा…

नाशिकच्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर 'महाराष्ट्र एफस्टीन फाईल' या चित्रपटाची घोषणा झाला होती. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाला आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र एफस्टीन फाईल विरोधात रूपाली चाकणकर यांची नोटीस, 25 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा...
Maharashtra Epstein File defamation suit
| Updated on: Jul 05, 2026 | 8:41 PM

नाशिकच्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित पात्र अभिनेत्री दीपाली सय्यद साकारण आहेत. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी ही केस कोर्टात चालू असल्याने अशा प्रकारे चित्रपट काढणे योग्य नसल्याचे म्हटले होते. आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी २५ कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीची नोटीस जारी केली आहे.

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक राजकीय व्यक्ती आणि आयएएस अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याचे देखील उघडकीस आले होते. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्याचे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो व्हायरल झाले होते. एवढेच काय उत्तर दस्तुरखुद्द अमित शाह यांच्या समोर भोंदूबाबा बसल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या पदावरुन राजीनामा द्यावा लागला आहे.

Maharashtra Epstein File नावाने या प्रकरणावर चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. कारण या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या सारखे पात्र अभिनेत्री दीपाली सय्यद रंगवणार आहेत. त्यांनी हेअर स्टाईल सह सर्व व्यक्तीमत्व रुपाली चाकणकर यांच्यासारखे केले आहे. त्यात या चित्रपटाचा फर्स्ट लूक झाला आहे. त्यात दीपाली सय्यद हिने रंगवलेल्या पात्रावरुन रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टात अशोक खरात याची ईडी चौकशी सुरु आहे. एखाद्या खटला संपल्याशिवाय असे करता येत नसल्याचे चाकणकर यांनी म्हटले होते.

25 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस

महाराष्ट्र एफस्टीन फाईल चित्रपटाच्या टीमला रूपाली चाकणकर यांनी नोटीस पाठविली आहे. ही नोटीस ‘महाराष्ट्र एफस्टीन फाईल’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता, आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना पाठविली आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी 25 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे.

 

Follow Us