
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर हे कायमच चर्चेत असतात. त्यांनी अनेक मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून महागुरु म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगावकर हे त्यांच्या विचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी 9 वर्षांचा असताना मी कार चालवायला शिकलो असे म्हटले होते. आता त्यांची लेक श्रियाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच श्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांनी Mashable India ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 9 वर्षांचा असताना गाडी चालवली असे म्हटले. “आयुष्यातली पहिली गाडी वयाच्या 9व्या वर्षी विकत घेतली. तसेच, वरळी सी फेसच्या भागात ती गाडी चालवायलाही शिकले”, असे त्यांनी म्हटले. सचिन यांच्यासोबत त्यांची लेक श्रिया पिळगावकर देखील उपस्थित होती. वडिलांचे ते वाक्य ऐकून तिने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, मुख्यमंत्र्यांनी दिला आशीर्वाद
सचिन पिळगांवकर काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकरांनी 9 वर्षांचा असताना पहिली गाडी खरेदी केल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की, “मी 9 वर्षांचा होतो तेव्हा आताचा हा सी-लिंक नव्हता. मी तेव्हा टायकल वाडी दादर इथे राहायचो. टायकलवाडी शिवाजी पार्क इथे येते. मी 9 वर्षांचा असताना पहिली गाडी खरेदी केली. तिला मी मॉरिस माइनर बेबी हिंदुस्थान म्हणायचे. या गाडीला बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर वैगर होते. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती”
कशी होती लेकीची प्रतिक्रिया?
ते ऐकून मुलाखत घेणाऱ्याने विचारले की, “तुम्ही ती गाडी चालवायचे कशी?” त्यावर सचिन पिळगावकरांनी उत्तर दिले की, “नाही ड्रायव्हर होता. पण, मी 9 वर्षांचा असताना, याच वरळी सीफेसवर त्या गाडीमधून मी गाडी चालवायला शिकलो…” सचिन पिळगांवकरांनी फक्त नऊ वर्षांचे असताना गाडी खरेदी केल्याचे ऐकून मुलाखत घेणाऱ्याला मोठा धक्का बसला. पण, मुलाखतीत सचिन पिळगांवकरांसोबत उपस्थित असलेली त्यांची लेक श्रिया पिळगांवकरही चकीत होते. तसेच तिला हसू अनावर झाल्याचेही दिसत आहे. ते मुलाखत घेणाऱ्याला मला पुढे कुठे तरी उतरवा असे मजेशीर अंदाजात बोलताना दिसते.