सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, मुख्यमंत्र्यांनी दिला आशीर्वाद
मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून लग्नाचे वारेवाहत आहेत. एकापाठोपाठ एक अनेक कलाकारांची लग्न होत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान याने अभिनेत्रीशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो व्हायरल झाला आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी, सूरज चव्हाण, सोहम बांदेकर यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लग्न बंधनात अडकली आहे. तेजस्विनीने शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवण याच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय मंडळी उपस्थित होती. त्यासोबतच कलाकार विश्वातील देखील काही कलाकार देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांनी दिला आशीर्वाद
काही दिवसांपूर्वी तेजस्विनीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर सर्वांना तिच्या लग्नाची आतुरता होती. आज तेजस्विनीने मुंबईत मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले आहे. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तेजस्विनी आणि समाधान या जोडीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या जोडीला आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आले होते.
View this post on Instagram
तेजस्विनी आणि समाधानचा लूक
लग्नात तेजस्विनीने गुलाबी रंगाची भरजरी साडी नेसली आहे. त्यावर तिने गळ्यात नेकसेल, केसात गजरा, हातात बांगड्या, सिंपल लूक केला आहे. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे समाधानने अफव्हाईट रंगाची शेरवानी घातली आहे. दोघांचाही लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. चाहत्यांना दोघांचाही लूक प्रचंड आवडला आहे. तेजस्विनी आणि समाधानच्या नव्या प्रवासासाठी सर्वजण खूश आहेत.
ऑक्टोबर महिन्यात झाला होता साखरपुडा
ऑक्टोबर महिन्यात तेजस्विनी आणि समाधना यांचा साखरपुडा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला होता. साखरपुड्याच्या दोन आठवड्यांमध्येच तेजस्विनीने लग्न केले आहे. काल तेजस्विनीचा हळदी समारंभ पार पडला. या हळदी समारंभाला तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर फुलांची ज्वेलरी घातली होती. या लूकमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत होती. आता तेजस्विनीच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
