AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंबियांचा विरोध असताना कसं जुळलं अशोक सराफ – निवेदिता यांचं लग्न? सचिन पिळगांवकरांनी असं केलं तरी काय?

'लग्न करेल तर अशोकशीच...', निवेदिता यांच्या हट्टापुढे कुटुंबियांनी घेतलेली माघार... विरोध असताना देखील कसं पार पडलं अशोक सराफ आणि निवेदिता यांचं लग्न, सचिन पिळगांवकरांनी असं केलं तरी काय? फार कमी लोकांना माहितीये दोघांनी लव्हस्टोरी...

कुटुंबियांचा विरोध असताना कसं जुळलं अशोक सराफ - निवेदिता यांचं लग्न? सचिन पिळगांवकरांनी असं केलं तरी काय?
| Updated on: Jun 07, 2026 | 3:37 PM
Share

मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या चाहत्यांची संख्या आज फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. अशोक आणि निवेदिता सराफ यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आणि दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. फक्त ऑनस्क्रिनच नाही तर, ऑफस्क्रिन देखील दोघांनी चाहत्यांना कपल गोल्स दिले. कधीच लग्न करणार नाही… असं म्हणणारे अशोक सराफ कधी आणि कसे निवेदिता यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले आणि कसं दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं याबद्दल कदाचित फार काही कोणाला माहिती नसेल. अशोक सराफ आणि निवेदिता यांना एकत्र आणण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावली ती म्हणजे अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी…

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांची जोडी मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन जोडी आहे. अनेकांना दोघांची लव्हस्टोरी भावते. कुटुंबियांचा विरोध असताना देखील निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या पण लग्न अशोक सराफ यांच्यासोबतच केलं. कुटुंबियांचा विरोध, प्रेमातील अडथळे दूर करत दोघांनी लग्न केलं आणि संसार थाटला. सांगायचं झालं तर, अशोक सराफ जेव्हा नाटक करायचे, तेव्हा निवेदिता सराफ त्यांच्या वडिलांसोबत नाट्यगृहात यायच्या. एवढंच नाही तर, वडिलांमुळे निवेदिता यांची अशोक सराफ यांच्यासोबत ओळख झाली. कालांतराने या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं.

जेव्हा अशोक सराफ यांचा अपघात झाला, तेव्हा त्यांनी कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला. पण निवेदिता सराफ याचं अशोक यांच्यावर जीव जडलेला होता. त्यांनी कुटुंबियांना देखील सांगून ठेवलं होतं की, ‘लग्न करे तर अशोकशीच करेल…’, पण दोघांमध्ये 18 वर्षांचं अंतर असल्याने त्यांच्या नात्यासाठी कुटुंबियांचा विरोध होता. पण निवेदिता देखील दुसऱ्या कोणाशीच लग्न करण्यासाठी तयार नव्हत्या. तर अशोक सराफ देखील निवेदिता यांच्या प्रेमात होते. अखेर अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या मदतीने दोघांचं लग्न पार पडलं.

अशोक सराफ यांच्यासोबत लग्नाला, कुटुंबियांचा विरोध होता, पण निवेदिता सराफ यांच्या बहिणी देखील दोघांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला आणि कुटुंबियांची समज घातली. अखेर कुटुंबियांनी देखील निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर मंदिरात पारंपरिक पद्धतीने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं लग्न झालं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा