आरोपीचे फिंगर प्रिंटच व्हॅलिड नाहीत…वकिलाचे चार सवाल; सैफ अली खान केसमध्ये मोठा ट्विस्ट?
सैफ अली खान केसमध्ये मोठा ट्विस्ट आला असून आरोपीच्या वकिलाने पोलिसांच्या तपासावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांवरून आता सैफ अली खान हल्ला प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. आरोपीच्या वकिलाने नक्की काय प्रश्न उपस्थित केले आहेत?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका चोरानं त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर 6 वार झाले. हल्ल्यानंतर सैफला लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. मात्र त्याची प्रकृती ठिक झाली असून त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसच चौकशीदरम्यान आरोपीकडूनही बरेच खुलासे करण्यात आले. तसेच नक्की ही घटनी सर्व कशी घडली याबद्दल सीनक्रिएशनही करण्यात आलं. तसेच आज (24 जानेवारी 2025) रोजी आरोपीला बांद्रा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी आरोपीच्या वकिलाने सैफवरील हल्ल्यावरून संशयीत स्वरुपात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांमध्ये सीसीटीव्हीपासून ते पोलिसांना फोन करण्यापर्यंत चे प्रश्न होते.
आरोपीच्या वकिलाने उपस्थित केलेले प्रश्न
सहाव्या मजल्यावरच फक्त सीसीटीव्ही आहे. बाकी इमारतीत सीसीटीव्ही का नाही? ही आश्चर्याची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं
दुसरा प्रश्न उपस्थित केला की, मेड, बायको असून त्यांना रुग्णालयात नेताना त्यांच्यासोबत कोणीच का नव्हतं. तसेच त्यांना रिक्षाने हॉस्पिटलला का घेऊन जाण्यात आलं?
तिसरा प्रश्न म्हणजे सैफ अली खान किंवा सुरक्षा गार्ड तसेच करिना कपूरने लगेच 100 नंबरवर फोन का केला नाही?
असे तीन प्रश्न आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केले आहेत
दरम्यान आरोपीचे फिंगर प्रिंटच व्हॅलिड नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे. फिंगर प्रिंट हे आयओने आधी घेतले आहे. एक आठवड्यानंतर आरोपी सापडला आहे. जेव्हा फिंगर प्रिंट हवे असतात तेव्हा पूर्ण कॉरिडोअर का सील केलं गेलं नाही.
फिंगर प्रिंट घेण्यासाठी फ्लॅट आणि बिल्डिंग सील करावी लागते. मग नंतर फॉरेन्सिक टीम येते आणि फिंगर प्रिंट घेतल्या जातात. पण यात तसं काही घडलं नाही. फॉरेन्सिकला लेटरही दिलं गेलं नाही. त्यामुळे आता आरोपीचे घेतलेले फिंगर प्रिंटच व्हॅलिड नसल्याचं आरोपीच्या वकिलाने म्हटलं आहे.
आरोपीच्या वकिलाने उपस्थित केलेल्या अशा काही प्रश्नांवरून सैफ अली खानच्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागणार असल्याचं दिसत आहे. तसेच पुढील तपासादरम्यान या प्रकरणातील आणखी काही मुद्दे समोर येऊन या प्रकरणाला एक वेगळं लागण्याचीही शक्यता आहे.